शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ बीटचा भार एकाच पोलीस ठाण्यावर

By admin | Updated: February 9, 2015 23:18 IST

शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. लोकसंख्येत भर पडत असताना ग्रामीणचे चार आणि शहरातील पाच अशा एकूण नऊ बीटचा भार सद्यस्थितीत हिंगणघाट पोलीस स्टेशनवर आहे.

भास्कर कलोडे - हिंगणघाटशहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. लोकसंख्येत भर पडत असताना ग्रामीणचे चार आणि शहरातील पाच अशा एकूण नऊ बीटचा भार सद्यस्थितीत हिंगणघाट पोलीस स्टेशनवर आहे. यामुळे कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेत पोलिसांची संख्या मात्र तोकडी आहे. ग्रामीण भागाकरिता स्वतंत्र पोलीस ठाणे देण्याची मागणी होत आहे.हिंगणघाट ठाण्यातील पोलिसांना नागरिकांच्या समस्यांना तप्तरतेने न्याय देण्यात अडसर येत आहे. तक्रारी सोडविण्यासाठी यंत्रणा तोकडी पडत आहे. शहराच्या विस्तारीत भागासह ग्रामीणच्या चार बीटसाठी नव्या ग्रामीण पोलीस स्टेशनची निर्मिती करणे गरजेचे झाले आहे. येथील पोलीस स्टेशन अंतर्गत शहरातील काजी वॉर्ड, मातामंदिर वॉर्ड, शास्त्री वॉर्ड, गांधी वॉर्ड, निशानपूरा, लाडकी, बुरकोनी, वाघोली तसेच समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव बीटचा समावेश आहे. स्थानिक पोलीस स्टेशनला निरीक्षक, सहायक निरीक्षकासह, सहायक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नायक, शिपाई, वाहन चालक असे एकूण १३२ तैनाती आहे. प्रत्यक्षात अधिकारी व कर्मचारी असे एकूण १२४ जण कर्तव्यावर असून आठ कर्मचाऱ्यांची उणीव आहे. कर्तव्यावरील एकूण कर्मचाऱ्यांपैकी दररोजची साप्ताहिक सुटी, आजारी व वैकल्पिक सुट्यावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ३० असल्याने केवळ ९० कर्मचाऱ्यांना ९ बीटच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडावी लागते. ही वास्तविकता आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासाठी पाच, स्थानिक न्यायालयीन कामकाजाठी तीन, जिल्हा न्यायालयासाठी दोन तर वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी १० व समन्स वारंट पोहचविण्यासाठी सहा अशा एकूण २६ कर्मचाऱ्यांची पूर्तता झाल्यानंतर उर्वरित अधिकारी व कर्मचारी ६४ तर कामाचा व्याप मात्र अधिक अशी स्थिती आहे. यापैकी २० जणांकडे पेट्रोलिंगची जबाबदारी असल्याने त्यांचा परिणाम प्रलंबित प्रकरणाच्या तपासावार होत आहे. जिल्ह्यात हिंगणघाट शहर संवेदनशील मानल्या जाते. जिल्हा सीमेवरील दारूबंदीचा भार येथील पोलिसांवर आहे. अवैध रेती वाहतूक, सणासुदीचा बंदोबस्त, निवडणूक सभा, बैठक, अपघात, शेतकरी आत्महत्या, खून, मारामाऱ्या व नैसर्गिक आपत्ती यासह रेल्वे गेट नं. १४ च्या चालू बंदमुळे दिवसातून अनेकदा विस्कळीत होणारी वाहतूक हिंगणघाट पोलिसाकरिता डोकेदुखी ठरते. काळानुसार गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे पद्धत सुद्धा बदलली तालुक्यातील लघु उद्योगाची संख्या वाढतीवर असून परप्रांतीय मजुरांची संख्याही येथे अधिक आहे. पोलिसांची संख्या व पोलिसांवरील कामाचा भार याची जनसामान्यांना जाणीव असली नसली तरी कायदा व सुव्यवस्था मात्र कायम राहावी, गुन्ह्यांचा शोध तत्परतेने लागावा, नवीन गुन्हे घडू नये, अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे. मात्र याकरिता येथील यंत्रणा तोकडी पडत असल्याची बाब प्रकर्षांने जाणवते. अशा स्थितीत जनतेला न्याय देण्यासाठी थोडी फार पोलीस संख्या वाढविण्याऐवजी शहरात स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशनची निर्मिती केल्यास पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होईल. तसेच जबाबदारी पार पाडताना कोणतीच समस्या भेडसावणार नाही.