शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पारा ४७ अंशावर असताना भारनियमन १६ तास

By admin | Updated: June 8, 2014 00:04 IST

जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय. पारा तब्बल ४७ अंशावर चढला आहे. सूर्य पुन्हा आग ओकणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही भागात तब्बल १४ ते १६ तास भारनियमन

महावितरणचा अफलातून कारभार : विभाग म्हणतो, वर्धा जिल्ह्यात भारनियमनच नाहीवर्धा : जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय. पारा तब्बल ४७ अंशावर चढला आहे. सूर्य पुन्हा आग ओकणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही भागात तब्बल १४ ते १६ तास भारनियमन केले जात आहे. या भागातील नागरिकांचे जगणेच मुश्किल झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे.खरीप हंगाम सुरू झाला आहे. मृग बरसण्याची शेतकर्‍यांना प्रतीक्षा आहे. या अनुषंगाने शेतकरी दिवसभर शेतात राबत आहे. ज्यांच्याकडे ओलिताची शेती आहे. त्यांना शेतात पाण्याची गरज आहे; मात्र भारनियमनामुळे तो ओलित करू शकत नाही. सध्या जिल्ह्यातील काही भागात सुरू असलेल्या १४ ते १६ तासांच्या भारनियमनामुळे ओलित कुठून करावे अशी चिंता त्याला आहे. इतक्या तासाच्या भारनियमनामुळे गावकर्‍यांनाही कमालीच्या तापमानाशी झुंज द्यावी लागत आहे. गावांमध्ये बहुतांश घरांचे छप्पर हे टिनाचे आहे. ४७ अंश सेल्सिअस तापमान असल्यामुळे टिना आगीसारख्या तापत आहे. यामुळे घरात राहणे कठीण झाले आहे. घराबाहेर पडले तर थेट तापमान अंगावर घ्यावे लागते. मोठय़ांनाच या तापमानात दिवस काढणे कठीण असताना लहान मुलांचे तर हालच आहे. एकूणच तापमान आणि अशातच होत असलेल्या भारनियमनामुळे नागरिकांचे जिणे कठीण होऊन बसले आहे.शहरातील नागरिकांना मात्र या भारनियमनाचा फारसा फटका नाही.  शहरातील रस्ते दिवसभर निर्मनुष्य असल्याचे चित्र आहे. या आगीत कोणीही घराबाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाही. बाजारपेठांमध्ये दुकानदारांशिवाय एकही ग्राहक फिरकताना दिसत नाही. एकूण वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या बिकट परिस्थितीत महावितरण भारनियमन करून या आगीत तेल टाकण्याचे काम करीत आहे. महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात भारनियमन करण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. मागील आठवड्यात  ३ हजार मे.वॅ. विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना भारनियमनाचा फटका सहन करावा लागला, असेही सांगण्यात आले; मात्र आता ही स्थिती राहिली नाही. या आठवड्यापासून भारनियमन होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रात भारनियमनाच्या शेड्युलमध्ये ‘डी’ सेक्शनमध्ये मोडत असलेल्या फीडर परिसरात भारनियमन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील हिंगणघाट उपविभागातील दोन, आर्वी आणि वर्धा उपविभागातील प्रत्येकी एक फीडर डी मध्ये येत असल्याने या भागातील शेतकर्‍यांना १४ ते १६ तास भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. ही स्थिती केवळ वर्धेची नसून ती राज्याची असल्याचेही कार्यकारी अभियंता आर. आर. कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)