शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

नियम धाब्यावर बसवून उडाले विवाह सोहळ्यांचे बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. संचारबंदीसह जमावबंदी कायदा लागू आहे. असे असताना विवाह सोहळा, इतर कार्यक्रम, बैठका, सत्कार सोहळे प्रशासनाकडे रीतसर परवानगी घेऊन आयोजित केले जात आहेत. विवाह सोहळ्यात यापूर्वी ५० लोकांची उपस्थिती मर्यादा प्रशासनाने घालून दिली असली तरी प्रत्यक्षात २०० ते ३०० लोक उपस्थित राहत असून प्रशासनाच्या डोळ्यात नागरिकांकडूनच धूळ झोकली जात आहे.

ठळक मुद्देचार भिंतींआड होताहेत बैठका। जिल्ह्यात कोरोनाचे पाऊल पडते पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना लपून-छपून कार्यक्रम, बैठका उरकणाऱ्यावर भर दिला जात असून यात प्रशासनाचे नियम पायदळी तुडविले जात आहते. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. संचारबंदीसह जमावबंदी कायदा लागू आहे. असे असताना विवाह सोहळा, इतर कार्यक्रम, बैठका, सत्कार सोहळे प्रशासनाकडे रीतसर परवानगी घेऊन आयोजित केले जात आहेत. विवाह सोहळ्यात यापूर्वी ५० लोकांची उपस्थिती मर्यादा प्रशासनाने घालून दिली असली तरी प्रत्यक्षात २०० ते ३०० लोक उपस्थित राहत असून प्रशासनाच्या डोळ्यात नागरिकांकडूनच धूळ झोकली जात आहे. कोरोनाच्या या संकटकाळात राजकीय पक्षही भान हरपले आहेत. त्यांच्याकडूनही बिनधास्तपणे सत्कार सोहळे आयोजित केले गेले. या प्रकरणात नुकतेच आयोजकांसह उपस्थितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जमावबंदी लागू असल्याने बैठक घेण्यावरही बंदी असताना लपून-छपून चार भिंतींआड विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून बैठका घेतल्या जात आहेत. विवाह सोहळ्यापूर्वी होणारा मांसाहारी जेवणावळीचा कंदुरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला दोनशेवर नागरिकांची गर्दी उसळली. यातील दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने इतवारा परिसरातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याची बाब लक्षात घेत प्रशासनाने तीन दिवस तातडीचे लॉकडाऊन जाहीर केले. चार महिन्यांपासून लॉकडाऊनच राहावे लागत असल्याने नागरिक वैतागून गेले आहेत. ‘चूक एकाची आणि मनस्ताप सर्वांना’ असा काहीसा प्रकार नागरिकांच्याच बेशिस्त कृतीमुळे घडत आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असताना त्यांच्याकडूनच बंदीच्या काळातही कार्यक्रम, बैठका आणि विवाह सोहळ्यात मर्यादेपेक्षा अधिक गर्दी जमवून बेकायदेशीर कृत्य केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने यापुढे समारंभांना परवानगीच देऊ नये, असा सूर सुजाण नागरिकांतून आळविला जात आहे. 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या