येळाकेळीच्या ‘उन्नई’ची पाणी साठवण क्षमता घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST2020-05-04T05:00:00+5:302020-05-04T05:00:12+5:30
येळाकेळी येथील उन्नई बंधाºयातून उचल करण्यात आलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील सुमारे १८ हजार कुटुंबीयांना केल्या जातो. सध्यास्थितीत महाकाळीच्या धाम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी या प्रकल्पातून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वर्धा शहर आणि शहराशेजारील १३ गावांमध्ये यंदा पाणी समस्या निर्माण होणार नाही असे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

येळाकेळीच्या ‘उन्नई’ची पाणी साठवण क्षमता घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी येळाकेळी येथील उन्नई बंधारा येथे अडविल्या जाते. त्यानंतर तेथून उचल करण्यात आलेल्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील नागरिकांना केला जातो. असे असले तरी या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने उन्नई बंधाऱ्याची पाणी सावठण क्षमताच कमी झाली आहे. या बंधाºयाला गाळमुक्त करून त्याची पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज आहे.
येळाकेळी येथील उन्नई बंधाऱ्यातून उचल करण्यात आलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील सुमारे १८ हजार कुटुंबीयांना केल्या जातो. सध्यास्थितीत महाकाळीच्या धाम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी या प्रकल्पातून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वर्धा शहर आणि शहराशेजारील १३ गावांमध्ये यंदा पाणी समस्या निर्माण होणार नाही असे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. परंतु, ज्या उन्नई बंधाऱ्यातून वर्धा न.प. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाण्याची उचल करते. त्याच बंधाऱ्यात सध्या मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमताच कमी झाली आहे. त्यामुळे पाणी उचल संस्था असलेल्या वर्धा नगरपालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पाणी पुरवठ्याचे नियोजनच चूकत आहे.
येळाकेळी येथील उन्नई बंधाऱ्यातील गाळवेळीच न काढल्यास वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सदर प्रकरणी वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. यासाठी पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
पालिकेकडून पत्रव्यवहार; पण कार्यवाही शून्य
येळाकेळी येथील उन्नई बंधारा गाळमुक्त व्हावा या हेतूने वर्धा नगर पालिकेने वर्धा पाटबंधारा विभागाकडे पत्र व्यवहार केले. परंतु, पाटबंधारे विभागातील काही अधिकारी हा विषय मार्गी लावण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची ओरड वर्धा नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. त्यामुळे वर्धा पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.
वर्षाला देतेय ५० लाख
धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले आणि उन्नई बंधारा येथून उचल करण्यात आलेल्या पाण्याचा मोबदला म्हणून वर्धा नगरपालिका प्रशासन वर्धा पाटबंधारे विभागाला वर्षाला सुमारे ५० लाख रुपयांचा मोेबदला देते. परंतु, उन्नई बंधाऱ्यातून गाळ काढण्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.