जलवाहिनी फोडली पालिकेचे लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:00 IST2019-04-15T22:00:19+5:302019-04-15T22:00:35+5:30
दिलीप बिल्डकॉन प्रशासनाने खोदकामादरम्यान वर्धा नदीवरून देवळीला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीच फोडली. त्यामुळे याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. जलवाहिनी फुटल्याने पालिका प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले असून माहिती मिळताच खा. रामदास तडस यांनी घटनास्थळ गाठले. दुष्काळी स्थितीत पाण्याचा अपव्यय झाल्याची परिस्थिती पाहून खा. तडस संतापले. त्यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

जलवाहिनी फोडली पालिकेचे लाखोंचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : दिलीप बिल्डकॉन प्रशासनाने खोदकामादरम्यान वर्धा नदीवरून देवळीला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीच फोडली. त्यामुळे याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. जलवाहिनी फुटल्याने पालिका प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले असून माहिती मिळताच खा. रामदास तडस यांनी घटनास्थळ गाठले. दुष्काळी स्थितीत पाण्याचा अपव्यय झाल्याची परिस्थिती पाहून खा. तडस संतापले. त्यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
जलवाहिनी फुटल्याने देवळीचा पाणी पुरवठा दहा दिवसांसाठी प्रभावीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच खा. रामदास तडस घटनास्थळ गाठून पाहणी केली. परिस्थिती एकदम विदारक असल्याचे लक्षात येताच घटनास्थळी असलेल्या जेसीबीची चाबीच त्यांनी घेऊन घेतली. शिवाय सुरू असलेले काम बंद पाडून घटनेची माहिती फोनवरून देवळीच्या ठाणेदारांसह पोलीस अधीक्षकांना दिली. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी दिलीप बिल्डकॉनचे विभागीय मॅनेजर गिरीष तलवार यांच्यांशी मोबाईलवर संपर्क साधून रोष व्यक्त केला. दरम्यान न.प. मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी देवळी पोलीसात तक्रार दिली आहे. त्यातून गैरअर्जदारावर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.
दहा दिवस मिळणार नाही पाणी
अंदोरी येथील वर्धा नदीवरून देवळी शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना गेल्या ५० वर्षांपासून कार्यान्वित आहे; पण कालांतराने ही योजना तांत्रिक दृष्ट्या नादुरूस्त ठरल्याने नव्याने ३५ कोटींच्या निधीतून अद्यावत अशी पाणी पुरवठ्याची योजना उभी राहिली. मात्र, दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कामगारांकडून काम करताना ही जलवाहिनी फोडली. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास देवळीच्या यशोदा नदीजवळील मुख्य जलवाहिनी फोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला आहे. परिणामी, पुढील ८ ते १० दिवसांपर्यत देवळीचा पाणी पुरवठा बंद राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.