जलसंधारण अधिकाऱ्यास विवाहितेचे अश्लील फोटो व्हायरल करणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST2019-11-27T06:00:00+5:302019-11-27T06:00:05+5:30
पोलीस सूत्रानुसार, पीडिता आणि आरोपी दीपक लांडगे रा. बीड यांच्यात लग्नापूर्वी चांगलीच जवळीक होती. इतकेच नव्हे तर त्यांची ही जवळीक लग्नाच्या विषयापर्यंत आली होती. त्यानंतर दोघांनीही विवाह करण्याचे निश्चित केले होते. याच घनिष्ठ मैत्रीदरम्यान दोघांनीही एकमेकांचे छायाचित्र टिपले. ते छायाचित्र दीपक याच्याकडे होते.

जलसंधारण अधिकाऱ्यास विवाहितेचे अश्लील फोटो व्हायरल करणे भोवले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एका विवाहितेचे अश्लील फोटो तिच्याच कौटुंबिक व्हॉटस्अॅप ग्रुपवर अपलोड करून त्या विवाहितेची बदनामी केल्याप्रकरणी आर्वी येथील जि. प. लघु पाटबंधारे उपविभागाचे जलसंधारण अधिकारी दीपक लांडगे आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, पीडिता आणि आरोपी दीपक लांडगे रा. बीड यांच्यात लग्नापूर्वी चांगलीच जवळीक होती. इतकेच नव्हे तर त्यांची ही जवळीक लग्नाच्या विषयापर्यंत आली होती. त्यानंतर दोघांनीही विवाह करण्याचे निश्चित केले होते. याच घनिष्ठ मैत्रीदरम्यान दोघांनीही एकमेकांचे छायाचित्र टिपले. ते छायाचित्र दीपक याच्याकडे होते. अशातच लग्नापूर्वी दीपकने १० लाखांच्या हुंड्याची मागणी केली. त्यामुळे पीडितेचे लग्न दीपकशी होऊ शकले नाही. त्यानंतर पीडितेचा विवाह २०१७ मध्ये एका तरुणासोबत झाला. लग्नापूर्वी आपल्यासोबत राहिलेल्या मुलीने आपल्याला डावलत दुसऱ्याशी लग्न केल्याची माहिती मिळताच दीपकने पीडितेचे छायाचित्र पीडितेच्या कुटुंबीयांच्या मेल आयडीवर पाठवून तिची बदनामी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होत हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यानंतर दीपकचा विवाह एका दुसऱ्या मुलीशी झाला. दीपक आणि त्याच्या पत्नीने पीडितेचे अश्लील छायाचित्र व्हायरल करून तिची बदनामी केल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर प्रकरणी पीडितेने औरंगाबाद पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर हिच तक्रार पुढील कार्यवाहीसाठी सेवाग्राम पोलीस ठाण्यात पाठविण्यात आली आहे. शिवाय या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी पती-पत्नीविरुद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. सदर प्रकरण कुठले नवीन वळण घेते काय, याकडे साºयांचेच लक्ष लागले आहे.
प्रियकराकडून युवतीचे छायाचित्रासह व्हिडिओ व्हायरल
वर्धा : लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने युवतीचे छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल करून युवतीची बदनामी केली. या प्रकरणाची तक्रार आर्वी पोलिसांत दाखल करण्यात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित युवतीचे आणि परिक्षित पवार रा. नगर, शेगाव जि. बुलढाणा यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणास्तव युवतीने परिक्षित यास लग्न करण्यास नकार दिला. संतापलेल्या परिक्षित त्याच्या मोबाईलमध्ये असलेले युवतीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. अखेर युवतीने आपला मोबाईल क्रमांक बंद केला. त्यामुळे संतापलेल्या परिक्षितने सर्व छायाचित्र व व्हिडिओ युवतीच्या भावाच्या मोबाईलवर पाठविले. तसेच युवतीच्या मैत्रिणींच्याही मोबाईलवर तसेच सोशल मीडियावरही व्हायरल केले. यामुळे युवतीची बदनामी झाल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे आर्वी पोलिसांनी सांगितले.