तपासणी पथकांचा वाहनांवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:19+5:30

आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक शाखेने पथक नियुक्त केली आहे. भरारी पथक १६, स्थीर सर्व्हेंक्षण पथक १६, व्हिडीओ चित्रीकरण पथक १६, व्हीडीओ चित्रिकरण पाहणी पथक ५ व खर्चनियंत्रण पथक ५ अशी एकूण ५८ पथक नियुक्त करण्यात आले आहे.

'Watch' on inspection squad vehicles | तपासणी पथकांचा वाहनांवर ‘वॉच’

तपासणी पथकांचा वाहनांवर ‘वॉच’

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : ५८ पथकाची निर्मिती, चेक नाक्यावर होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासूनच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक विभागाने विविध ५८ पथक स्थापन केले आहे. ही सर्व पथके आचारसंहिता लागू झाल्यापासूनच सक्रीय झाले आहे. जिल्ह्यातील मद्य व रोख रक्कम वाहतूकीवर या पथकांची करडी नजर असणार आहे.
आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक शाखेने पथक नियुक्त केली आहे. भरारी पथक १६, स्थीर सर्व्हेंक्षण पथक १६, व्हिडीओ चित्रीकरण पथक १६, व्हीडीओ चित्रिकरण पाहणी पथक ५ व खर्चनियंत्रण पथक ५ अशी एकूण ५८ पथक नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय पोलीस विभागाने १६ पथक तयार केले आहेत. हे पथक नियमित तपासणी करीत आहेत. या पथकांच्या माध्यमातून वाहन तपासणी, आचारसंहिता भंगाची तक्रार असल्यास कार्यवाही करणे, मद्य वाहतूक व रोख रक्कम वाहतुकीवर नजर ठेवण्याचे काम सर्वत्र सुरु आहे. नागरिकांनी रोख रक्कम बाळगतांना त्यांचे पुरावे सोबत बाळगणे आवश्यक आहे. आचारसंहितेच्या काळात रोख रक्कम वाहतुकीवर आयोगाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास रोख रक्कम प्रवासात बाळगू नये. मतदार यादीत नाव शोधणे, इपिककार्ड आदीसाठी निवडणूक आयोगाने १५० हा टोल फ्री क्रमांक सर्वांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. नागरिकांनी मतदार यादी व नाव यासंबधी तक्रारी समस्या या क्रमांकावर नोंदवाव्या. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नागरिकांनी नोंदविता याव्यात यासाठी आयोगाने सीव्हीजील अ‍ॅप सुरु केले असून या अ‍ॅपव्दारे प्राप्त तक्रारीचे १०० तासात निराकरण करण्यात येणार आहे.

पन्नास हजारावर रक्कम बाळगण्यास मनाई
आचारसंहितेच्या काळात प्रवास करीत असतांना नागरिकांनी ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगू नये असे निर्देश लोकसभा निवडणूकीत आयोगाने दिले होते. हा नियम याही वेळी असणार आहे. ५० हजारांपेक्षा जास्त रक्कमेचे पुरावे सादर करावे लागतील अन्यथा रक्कम जप्त होणार आहे.

Web Title: 'Watch' on inspection squad vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.