शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेकरांनो, सावधान! कोरोना संक्रमणात वर्धा तालुका पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

मागील १३ दिवसांत जिल्ह्यात ६ हजार ८७५ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, वर्धा तालुक्यात मागील १३ दिवसांत ३४७, आर्वी तालुक्यात २३, आष्टी तालुक्यात १०, कारंजा तालुक्यात ५०, हिंगणघाट तालुक्यात ११३, समुद्रपूर तालुक्यात तीन, देवळी तालुक्यात ११, तर सेलू तालुक्यात १६ नवीन कोविडबाधित सापडले आहेत.

ठळक मुद्दे१३ दिवसांत आढळले तब्बल ३४७ नवीन कोविड बाधित व्यक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील १३ दिवसांत जिल्ह्यात तब्बल ५७३ नवीन कोविडबाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची सध्या आता १० हजार ६६२ झाली आहे. असे असले तरी नवीन कोविड बाधितांपैकी ३४७ रुग्ण हे एकट्या वर्धा तालुक्यातील असल्याने वर्धा तालुक्यात कोरोना संक्रमणाची गती इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. दिवसेंदिवस कोविडबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनीही आता अधिक दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकारपणे पालन करणे गरजेचे आहे.प्राप्त माहितीनुसार,  मागील १३ दिवसांत जिल्ह्यात ६ हजार ८७५ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, वर्धा तालुक्यात मागील १३ दिवसांत ३४७, आर्वी तालुक्यात २३, आष्टी तालुक्यात १०, कारंजा तालुक्यात ५०, हिंगणघाट तालुक्यात ११३, समुद्रपूर तालुक्यात तीन, देवळी तालुक्यात ११, तर सेलू तालुक्यात १६ नवीन कोविडबाधित सापडले आहेत. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली आहे. कोरोना संकटाच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे  हे फायद्याचे ठरत असले तरी जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाच्या सूचनांना बगल दिली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. हिंगणघाट तालुक्यातील एका निवासी वसतिगृहात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हिंगणघाट तालुक्यातील सर्वच शाळा २० फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोनाची लस आली असली तरी कोरोनाचे संकट अजूनही कायम असल्याने सध्याच्या कोरोनात प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. शिवाय तसे आवाहनही करण्यात येत आहे. 

कोरोनामुळे तब्बल १३ व्यक्तींचा झाला मृत्यूमागील १३ दिवसांत ४७२ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला असला तरी सहा पुरुष आणि सात महिला असे एकूण १३ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना मृतकांच्या संख्येत वाढ होत असल्याने गाफील राहणाऱ्या वर्धावासीयांनी आता दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची नितांत गरजेचे आहे.

४७२ रुग्णांचा कोविडवर विजयमागील १३ दिवसांत जिल्ह्यात तब्बल ५७३ नवीन कोविड बाधित सापडले असले तरी याच कालावधीत ४७२ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या