शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Wardha: चीन, थायलंडमध्ये ‘खवल्या मांजर’ची मागणी मोठी, सहा तस्करांना तीन दिवसांची वनकोठडी

By चैतन्य जोशी | Updated: February 28, 2025 21:32 IST

Wardha News: पुलगाव येथील कॉटन मिल परिसरात एका कारमध्ये सहा तस्करांना खवल्या मांजरसह अटक केली. त्या खवल्या मांजरीचा दोन कोटींत सौदा होणार होता.

- चैतन्य जोशीवर्धा - पुलगाव येथील कॉटन मिल परिसरात एका कारमध्ये सहा तस्करांना खवल्या मांजरसह अटक केली. त्या खवल्या मांजरीचा दोन कोटींत सौदा होणार होता. विशेष म्हणजे या मांजरीची चायना अन् थायलंड देशात मोठ्या रकमेत खरेदी-विक्री होत असून, या कारवाईमुळे मोठ्या ‘रॅकेट’चा पर्दाफाश होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडेकर यांनी दिली. विशेष म्हणजे या सहाही तस्करांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. विशेष म्हणजे या प्रकरणात एका महिलेचाही समावेश असून, तिलाही लवकरच अटक केली जाणार आहे.

नफीत उल रहमान, रा. अमरावती, पचराज फेतराज पवार, रा. आगरगाव, मोहम्मद अनिस रा. अमरावती, गुरुबच्चनसिंग सागरसिंग बावरी, रा. पुलगाव, संकेत पंकज चव्हाण, रा. आगरगाव, अहमद खाँ अशरफ खाँ, रा. आकोली अशी अटक तस्करांची नावे आहेत.

...................................अंधश्रद्धेतून गुप्तधन शोधण्याचा प्रकार

खवल्या मांजरचा वापर मांत्रिक, तसेच काही कथित बाबांकडून केला जातो. अंधश्रद्धेतून गुप्तधन शोधण्यासाठी या वन्यजिवाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याच कारणातून पुलगावात पकडलेल्या तस्करांचा दोन कोटी रुपयांत होणारा सौदा उधळून लावला.......................

मुंबईतील चार जणांची चमू दाखलमुंबई येथील वाइल्ड लाइफ क्राइम कंट्राेल ब्यूरोकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार वन विभागाकडून तीन दिवसांपासून पाळत ठेवली जात होती. मुंबई येथील चार अधिकाऱ्यांची चमूही पुलगावात दाखल होती. अखेर २७ रोजी सापळा रचून तस्करांना अटक केली.

....................महिलांच्या तस्करीचाही संशय ?

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तस्करांच्या मोबाइलची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात महिला व तरुणींचे फोटोग्राफही मिळून आले. अटक असलेल्या तस्करांनी यापूर्वीही खवल्या मांजरचा सौदा केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे महिला व मुलींची तस्करी करणारे रॅकेट असल्याचा संशय असून, त्या दृष्टीने तपास केला जातो आहे....................

मोठे ‘रॅकेट’ लवकरच उघडआरोपींच्या मोबाइलमध्ये अनेकांची नावे मिळाली आहेत, तसेच तरुणी, महिलांचेही फोटो आढळले आहेत. आरोपींनीही अनेकांची नावे सांगितली आहेत. त्यामुळे त्यांचा याच्याशी काय संबंध हे देखील तपासले जात आहे. लवकरच मोठे ‘रॅकेट’ उघड होण्याची शक्यता असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडेकर यांनी सांगितले.

...................उच्चस्तरीय चौकशीची गरज

गुप्तधन शोधून देण्याचा दावा करून त्यासाठी लाखो रुपयांपर्यंत किंमत सांगून कासव, खवलेमांजर, मांडूळ साप, घुबड आदी प्राण्यांच्या कातडी, हाड विकत घ्यायला लावणारी टोळी सक्रिय आहे. खवले मांजर गुप्तधनाचा संकेत देतेय, असे सांगून दावा करणारे मांत्रिक त्याजागी खोदायला लावते. खवले मांजर गुप्तधन शोधून देत नाही. खोटे व्हिडीओ व माहिती देऊन हा प्राणी लाखो रुपयांत विकल्या जातो. याप्रकरणाची वन विभागाने उच्चस्तरीय चौकशी करावी.-पंकज वंजारे, महाराष्ट्र राज्य युवा संघटक, अ.भा. अंनिस. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवSmugglingतस्करीCrime Newsगुन्हेगारी