शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Wardha; विलगीकरणात राहणाऱ्यांसाठी वर्ध्यातील विद्यार्थ्याने तयार केलं संकेतस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:44 IST

कठोर विलगीकरणात हा एकांतवास कष्टदायी ठरत असल्याची कानावर आलेली चर्चा एका दहावीच्या विद्यार्थ्याला अस्वस्थ करणारी ठरली आणि डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू रिलॅक्स इन क्वॉरेनटाईन डॉट कॉम हे संकेतस्थळ तयार झाले.

ठळक मुद्देदेशविदेशात ठरतंय लोकप्रियएकांतवास कष्टदायी ठरत असल्याची कानावर आलेली चर्चा अस्वस्थ करणारी ठरली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: करोनामुळे विलगीकरणात बंदिस्त झालेल्यांना विरंगुळा म्हणून शालेय विद्यार्थ्याने तयार केलेले संकेतस्थळ देशविदेशात लोकप्रिय ठरू लागले आहे. विदेशातून किंवा परप्रांतातून आलेल्यांना शासकीय किंवा गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. चौदा दिवसाचे संपर्कविहीन वास्तव्य अनेकांसाठी अस्वस्थ करणारे ठरते. या एकांतवासाला गृह विलगीकरणात थोडाबहुत कुटूंबियाच्या सहवासाचा दिलासा असतो. मात्र कठोर विलगीकरणात हा एकांतवास कष्टदायी ठरत असल्याची कानावर आलेली चर्चा एका दहावीच्या विद्यार्थ्याला अस्वस्थ करणारी ठरली.सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप श्रीवास्तव यांचा मुलगा व विद्यानिकेतनचा विद्यार्थी असलेल्या प्रखर श्रीवास्तवने कुटूंबात व नातलग मंडळीत विलगीकरणावर चर्चा ऐकल्यानंतर काहीतरी करण्याचे निश्चित केले. असे एकटेपण वाट्याला आलेल्यांसाठी विरंगुळ्याचे साधन म्हणून संकेतस्थळ तयार करण्याचे त्याने ठरवले. दोनच दिवसापूर्वी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू रिलॅक्स इन क्वॉरेनटाईन डॉट कॉम हे संकेतस्थळ तयार झाले.हे व्यासपीठ एका पृष्ठावर स्वतंत्रपणे राहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करते. व्यक्तींना त्याद्वारे योग्यप्रकारे वेळ घालवता येतो. नवनव्या बातम्या उपलब्ध असतात. विविध छंद जोपासता येतात. संगीत, विनोदी खेळ, समुपदेशन, ध्यान साधना करण्याचे तंत्र उपलब्ध आहे. याच माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना जोडता येते. वृद्ध व एकट्याने राहणाऱ्यांसाठी काळजीपूर्वक कसे वागावे याचेही मार्गदर्शन मिळते.विशेष म्हणजे न्यूज ट्रॅकर असल्याने व्यक्ती वेगवेगळ्या माहितींची खातरजमा स्वत:च करू शकते. सामाजिक अंतर अनुभवत असणारे व्यक्ती या संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेकांशी बोलतात. अनेक समूह या स्थळावर दोनच दिवसात निर्माण झाले आहेत. इतक्या कमी कालावधीत दोन हजार व्यक्तींनी या संकेतस्थळाला भेट दिली असून आयर्लंड, स्पेन, इंग्लंडसह भारतातील व्यक्तींनी या स्थळाचा अनुभव घेणे सुरू केले आहे.प्रखर श्रीवास्तवला याविषयी विचारणा केल्यावर तो म्हणाला की दोन आठवडे एकटे राहावे लागत असल्याचे ऐकायला मिळाल्यावर मला विचित्रच वाटले. अशा लोकांसाठी काही करता येईल कां म्हणून वडिलांना विचारणा केली. त्यांचे मार्गदर्शन मिळाले, पण या संकेतस्थळावर नवीन काही असावे म्हणून मी केलेल्या प्रयत्नाला पावती मिळाली. लोकांचा प्रतिसाद पाहून त्यात नवी भर टाकण्याचा विचार करीत आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस