वर्धा-रसुलाबाद मार्ग मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST2019-09-06T06:00:00+5:302019-09-06T06:00:10+5:30

वाहनचालकांना रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेच कळेनासे झाले आहे. रात्री, खड्डे दृष्टीस पडत नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. यापूर्वी या मार्गावर झालेल्या अपघातात अनेकांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्यात. तिगाव, आमलावासींना ये-जा करण्याकरिता हा एकमेव मार्ग आहे.

Wardha-Rasulabad road death trap | वर्धा-रसुलाबाद मार्ग मृत्यूचा सापळा

वर्धा-रसुलाबाद मार्ग मृत्यूचा सापळा

ठळक मुद्देरस्त्याला आले तळ्याचे स्वरूप : प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा-रसुलाबाद मार्गादरम्यान खोल खड्डे असल्याने वाहतूक असुरक्षित झाली आहे. दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र, दुरुस्तीकडे संबंधितांचा कानाडोळा आहे.
वर्ध्यापासून तिगाव-आमला आत किलोमीटर अंतरावर आहे. या दरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे मागील अनेक दिवसांपासून पडले असून संपूर्ण रस्त्यावरील डांबर उखडलेले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हे खड्डे पाण्याने भरलेले असतात. काही खड्डयांना तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे वाहनचालकांना रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेच कळेनासे झाले आहे. रात्री, खड्डे दृष्टीस पडत नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. यापूर्वी या मार्गावर झालेल्या अपघातात अनेकांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्यात. तिगाव, आमलावासींना ये-जा करण्याकरिता हा एकमेव मार्ग आहे.
याच मार्गाची मागील कित्येक दिवसांपासून दुर्दशा झालेली आहे. येथून ये-जा करताना नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींसह संबंधितांचे याकडे दुर्लक्ष आहे. रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी तिगाव, आमला व परिसरातील गावांतील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Wardha-Rasulabad road death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.