शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या लोकशाहीकरिता वर्ध्यात आत्मक्लेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

भारत सरकारने १२ नोव्हेंबर २०१९ ला काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली. आता शंभर दिवसाचा कालावधी लोटला असून कश्मिरमध्ये समाजमांध्यमांना व सामान्य नागरिकांना दुरध्वनी संपर्काची सेवा बंद आहे. त्यामुळे कश्मिरचा उर्वरित देश आणि जगाशी कोणताही संपर्क नाही. कश्मिरमध्ये रोजगार आणि व्यापार पूर्णत: थांबलेले आहे. अत्यंत कठीण व भीतीच्या वातावरणात सर्वसामान्य कश्मिरी माणसांचे जगणे सुरु आहे.

ठळक मुद्देदिवसभर केला उपवास : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारत सरकारच्या माध्यमातून काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करुन शंभर दिवस पूर्ण झाले आहे. या संचारबंदीने तेथील सामान्य जनतेचे जीवन हलाखीचे झाले आहे. त्या लोकांना मुक्त श्वास घेण्याकरिता लोकशाहीचा अधिकार बहाल करा, अशी मागणी वर्ध्यातील लोकशाहीकरिता समर्पित नागरिकांनी बुधवारी एक दिवस आत्मक्लेश उपवास करुन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे.भारत सरकारने १२ नोव्हेंबर २०१९ ला काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली. आता शंभर दिवसाचा कालावधी लोटला असून कश्मिरमध्ये समाजमांध्यमांना व सामान्य नागरिकांना दुरध्वनी संपर्काची सेवा बंद आहे. त्यामुळे कश्मिरचा उर्वरित देश आणि जगाशी कोणताही संपर्क नाही. कश्मिरमध्ये रोजगार आणि व्यापार पूर्णत: थांबलेले आहे. अत्यंत कठीण व भीतीच्या वातावरणात सर्वसामान्य कश्मिरी माणसांचे जगणे सुरु आहे. त्याकरिता कश्मिरी जनतेसोबत आपण एकतेची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. ते भारतीय लोक आहेत व मनुष्य म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार आहे. म्हणून त्यांना राज्यघटनेनुसार लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आज वर्ध्यातील लोकशाही समर्पित नागरिकांनी आत्मक्लेश उपवास सत्याग्रह करुन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या मार्फत भारत सरकारला निवेदन दिले.विविध मागण्यांचे निवेदन देताना किसान अधिकारी अभियानचे अविनाश काकडे, सुरज पाखडे, सुनिल कोल्हे, मिलिंद मोहोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, शहराध्यक्ष सुधीर पांगुळ, प्रीतेश चोरे, प्रमोद हजारे, हरिष नान्दे, रिजवान पठाण, विलास अमझीरे, धनराज अमझीरे, लक्ष्मण नांदणे, ज्ञानेश्वर ढगे, नूतन माळवी आदींची उपस्थिती होती.या आहेत मागण्यासर्व पक्ष आणि संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांना नजर कैदेतून मुक्त करावे, सर्व समाजमाध्यमे व दुरध्वनी सेवा सर्वांसाठी मुक्त करावी व जम्मु कश्मिरला पूर्ण राज्याचा दर्जा पूर्ववत देण्यात यावा, या तीन प्रमुख मागण्या सरकारकडे करण्यात आल्या. या मागण्यांसाठी आज वर्ध्यात दिवसभर आत्मक्लेश उपवास करण्यात आला.