शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्भरणाला जोरदार पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 18, 2016 01:23 IST

राज्यात उद्भवलेली पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता सर्वत्र पुनर्भरण यंत्रणेवर भर देण्याच्या बाबी समोर येऊ लागल्या होत्या.

वर्धा : राज्यात उद्भवलेली पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता सर्वत्र पुनर्भरण यंत्रणेवर भर देण्याच्या बाबी समोर येऊ लागल्या होत्या. पण कुणी पुढाकार घेताना दिसत नव्हते़ वर्धेत मात्र आपला वैद्यकीय व्यवसाय हा समाजहिताकरिता काही काळ बाजूला सारून डॉक्टरांनी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णयच घेतला नाही तर लोक सहभागातून कामालाही सुरुवात केली. हे काम आता पूर्णत्वास आले असून पुनर्भरणाकरिता आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे़वैद्यकीय जनजागृती मंचने हनुमान टेकडी, पिपरी मेघे येथे पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याची संकल्पना राबवली़ टेकडीच्या सभोवताल खंदक करण्यात आले आहे़ प्रथम केवळ वैद्यकीय जनजागृती मंचच्या सदस्यांनी सुरु केलेल्या कार्याला लोकसहभाग लाभला़ तब्बल दोन ते अडीच महिने डॉक्टर आणि नागरिकांनी हातात पावडे घेऊन खंदक तयार केले़ झाडांसाठी खड्डेही यावेळी खोदण्यात आले. खंदक खोदण्याचे काम आटोपले असून आता फेन्सिंगसाठी लोकसभागातून निधी उभारला जाणार आहे़ पावसाचे आगमन होताच वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे़ वैद्यकीय जनजागृती मंचच्या पुढाकाराने वर्धेत एका टेकडीवर जल पुनर्भरणाचा प्रयोग राबविण्यात आला़ पाणीटंचाई निवारणार्थ लोकसहभागातून असेच प्रयोग जिल्ह्यात अन्यत्र राबविले जाणेही गरजेचे आहे़ (कार्यालय प्रतिनिधी) जल पुनर्भरणाचे वैयक्तिक प्रकल्पही गरजेचेवैद्यकीय जनजागृती मंचने सामूहिक जल पुनर्भरणाचा प्रयोग राबविला़ या मंचातील डॉक्टरांनी वैयक्तिक जल पुनर्भरणाचे संयंत्रही नागरिकांना उपलब्ध करून दिले आहेत़ शिवाय अनेक डक्टरांनी ते आपापल्या घरी बसविले आहेत़ यासाठी अधिक खर्च येत नसल्याने नागरिकांनी सदर संयंत्र आपापल्या घरी लावावे, असे आवाहन केले जात आहे. जल पुनर्भरणाची गरज ओळखून नागरिकांनी वैयक्तिक प्रकल्प राबविले तर जिल्ह्यात कधीही पाणी टंचाई जाणवणार नाही़ यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घेत पुनर्भरण करणे गरजेचे आहे़ यासाठी लागणारे संयंत्र डॉ. सचिन पावडे यांच्यासह व्हीजेएमच्या सदस्यांकडे उपलब्ध आहे़