क्षतिग्रस्त पुलाला दुरूस्तीची प्रतीक्षा
By Admin | Updated: August 17, 2015 02:20 IST2015-08-17T02:20:36+5:302015-08-17T02:20:36+5:30
चनाजी (टाकळी) ते सोनेगाव (बाई) या गावांना जोडण्यासाठी भदाडी नाल्यावर पूल बांधण्यात आला. मात्र हा पूल प्रत्येक पावसाळ्यात वाहुन जातो.

क्षतिग्रस्त पुलाला दुरूस्तीची प्रतीक्षा
वर्धा : चनाजी (टाकळी) ते सोनेगाव (बाई) या गावांना जोडण्यासाठी भदाडी नाल्यावर पूल बांधण्यात आला. मात्र हा पूल प्रत्येक पावसाळ्यात वाहुन जातो. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गत चार वर्षांपासून हा प्रकार येथे घडत आहे. मात्र यावर कायमस्वरुपी तोडगा काढला नाही. या पुलाच्या बांधकामाची चौकशी करुन पूल उंच करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
परिसरातील ग्रामस्थांकरिता हा पूल महत्त्वाचा आहे. मात्र नाल्याल पूर आला की प्रवाहात पूल वाहुन जातो. त्यमुळे सोनेगाव (बाई) या गावाचआ संपर्क तुटतो. सोनेगाव (बाई) येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी वायगाव (नि.), सरूळ, वर्धा येतात. तसेच सोनेगाव (बाई) येथील ग्रामस्थांसाठी बाजारपेठ वायगाव असल्याने खरेदीकरिता येथेच यावे लागते.
पावसाळा आला की नाल्याला पूर येतो. यात पूल वाहुन गेल्यावर यातायात ठप्प होते. बसफेरी बंद होतात. येथून दुचाकी वाहन घेऊन जाणे शक्य होत नाही. पावसाळा संपला की पुलाची डागडुजी केली जाते. मात्र पावसाळ्यात पुलाची अवस्था जैसे थे होते. याबाबत देवळी येथील बांधकाम विभागाला विचारणा असता योग्य माहिती देण्याचे टाळतात. डागडुजी करण्यासाठी निधी नसल्याचे सांगुन हा पूल आमच्या विभागात येत नाही अशी सबब पुढे करतात. पंतप्रधान ग्राम सडक योजना कार्यालयात तक्रार केली असता कंत्राटद येथे डागडुजी म्हणून दगड व मुरूम टाकतात, असे सांगण्यात येते.
हा पूल नेमक्या कोणत्या विभागाच्या देखरेखीत येतो यावर संभ्रम कायम आहे. या प्रकारामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशात गावात कोणी आजारी पडल्यास त्याला वेळेवर उपचार मिळत नाही.
पावसाळा आला की सोनेगाव (बाई) या गावाचा संपर्क तुटतो. हा प्रकार चार वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे येथे बस अथवा खाजगी वाहन येत नाही. प्रशासनाकडे विचारणा केली ते जबाबदारी झटकतात. येथील पुलाबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)