शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

वाई नाल्याला आला पूर; गावाचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

दुपारच्या सुमारास घरून कामासाठी बाहेर गावी गेलेले नागरिक तसेच शाळेत गेलेले विद्यार्थी पुलावरून पाणी वाहत असल्याने जागीच अडकून पडले आहेत. तसेच गावातील नागरिकांना गावाबाहेरदेखील जाता येत नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शाळेत गेलेली मुलगी घरी कधी येणार, असा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत आहे. नाल्यावरील पूल फारच ठेंगणा असल्याने पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली येतो. यामुळे वाहतूक ठप्प होते.

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : सततच्या पावसामुळे सालदरा तलावातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गाने वाई येथील नाल्याला पूर आला आहे. परिणामी, पुलापलीकडील गावाचा संपर्क तुटला असून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. दुपारच्या सुमारास घरून कामासाठी बाहेर गावी गेलेले नागरिक तसेच शाळेत गेलेले विद्यार्थी पुलावरून पाणी वाहत असल्याने जागीच अडकून पडले आहेत. तसेच गावातील नागरिकांना गावाबाहेरदेखील जाता येत नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शाळेत गेलेली मुलगी घरी कधी येणार, असा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत आहे. नाल्यावरील पूल फारच ठेंगणा असल्याने पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली येतो. यामुळे वाहतूक ठप्प होते. परिणामी पूर ओसरत पर्यंत प्रतिक्षा करावी लागते. ५ वर्षांपूर्वी  वसंत पुनवाटकर हा नागरिक याचपुलाला आलेल्या पुरात वाहून गेला असून त्याला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून पुलाची उंची वाढविण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, शासन व लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून कुणीही या गंभीर समस्येची दखल घेण्यात धन्यता मानली नाही. अखेर यंदाच्या पावसाळ्यातही सततच्या पावसाने पुलावरील वाहतूक ठप्प झाली असून गावाचा संपर्क तुटल्याने पूल उंच करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

माजी सरपंचांचा ठिय्यानागरिक पुलावरून जाण्याचा प्रयत्न करतात, अशा वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी पाण्यातून पूल ओलांडू नये, यासाठी माजी सरपंच गणेश गचकेश्वर, पोलीस पाटील, कोतवाल आदींसह काही नागरिक नाल्याच्या बाजूला ठिय्या मांडून बसले असून नागरिकांना आवागमन करण्यास मज्जाव करीत असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर