लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : झपाट्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांसह व्हायरल फ्लूने डोके वर काढल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध आजारांची लागण झालेल्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या आजाराची लागण बच्चेकंपनीपासून वयोवृद्धांपर्यंत व्यक्तींना होत असून शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालये फुल्ल झाल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.सध्याचे ढगाळी वातावरण हे अनेक आजारांसाठी पोषक ठरणारेच आहे. त्यातच झपाट्याने होणारे वातावरणातील बदल हे विविध आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहे. पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून त्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजार डोके वर काढत आहेत. त्यातच सध्या व्हायरल फ्ल्यूमुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. शहरातील प्रत्येक घरी व्हायरल फ्ल्यूचे एक किंवा दोन रुग्ण आढळून येत आहे. डोके व अंग दुखी, अंगात थंडी भरून ताप येणे आदी व्हायरल फ्ल्यूची लक्षणे आहेत. या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला अंग व डोकेदुचीच्या बेदना सहन कराव्या लागतात. चार ते पाच दिवस असणाऱ्या या तापाचा मुक्काम आता वाढला असून तो आठवड्याभऱ्याचा झाला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे विषाणू संसर्गामुळे होणाºया व्हायरल तापाचे स्वरूप आता बदलले,असे म्हटल्यास वावगे ठरू नये.तापाची लक्षणेसुरूवातीला असह्य असणाऱ्या डोके व अंगदुखीचा त्रास रुग्णाला होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच रुग्णाला अंगात थंडी भरून ताप येतो. अंगात थंडी भरून आलेला ताप आलटून-पालटून येतो. या तापाची लक्षणे आढळल्यास रुग्णाने तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, असे सांगण्यात येते.तापाचा मुक्काम वाढलाविषाणू संसर्गामुळे होणाऱ्या व्हायरल फ्लूचे स्वरूप आता वेगाने बदलले असल्याचे दिसून येते. यामुळे पूर्वी चार ते पाच दिवस असणाऱ्या तापाचा मुक्काम आता आठ ते दहा दिवसांवर आला आहे. शहरातील वाढते प्रदुषण, विचित्र वातावरण आणि जंतुसंसर्गामुळे वर्धेत या तापाचा जोर वाढला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शिवाय नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.व्हायरल फ्लूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात बऱ्यापैकी दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने आपण शनिवारी दुपारी लोकप्रतिनिधींसह खासगी वैद्यकीय अधिकाऱ्याची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत व्हायरल फ्लूला अटकाव करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. व्हायरल फ्लूची कुठलीही लक्षणे आढल्यास रुग्णाने घरगुती उपचार न करता तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.- पुरूषोत्तम मडावी,जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा.
वर्धेकरांवर ‘व्हायरल फ्लू’चा अटॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 23:39 IST
झपाट्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांसह व्हायरल फ्लूने डोके वर काढल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध आजारांची लागण झालेल्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
वर्धेकरांवर ‘व्हायरल फ्लू’चा अटॅक
ठळक मुद्देरुग्णांच्या संख्येत वाढ : शासकीय,खासगी रुग्णालये फुल्ल