गावकऱ्यांनी अस्वलाला लावले पिटाळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:25 IST2019-03-24T22:24:18+5:302019-03-24T22:25:31+5:30
रखरखत्या उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटले असून वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. वन्यप्राण्यांनी पाण्यासाठी शेतशिवारासह गावाकडे मोर्चा वळविला आहे.

गावकऱ्यांनी अस्वलाला लावले पिटाळून
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : रखरखत्या उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटले असून वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. वन्यप्राण्यांनी पाण्यासाठी शेतशिवारासह गावाकडे मोर्चा वळविला आहे.
गिरड-कोरा मार्गावर शिवणफळ शिवारातील किसना शिंदे यांच्या शेतातील मजुरांना अस्वल आढळून आले. दरम्यान, या घटनेची माहिती परिसरातील गावामध्ये वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच वनरक्षकांनी घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने आरडाओरड करीत फटाके फोडून अस्वलाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. ही अस्वल शेतशिवार मार्गाने उंदिरगाव, अंतरगाव शेतशिवारातून पिंपळगाव गावातून झुनका, पोथरा प्रकल्पाकडे गेली. यावेळी शेकडो नागरिकांसह वनविभाचे अधिकारी व कर्मचारी या अस्वलीच्या मार्गावर होते. या अस्वलीचा काही दिवसांपासून फरीदपूर धरण परिसरात वावर होता. येथील नागरिकांनी तिला पिटाळून लावले. त्यानंतर अस्वलीने आर्वी, शिवणफळ, उंदीरगाव, अंतरगाव, पिंपळगाव शिवारातून झुणका, पोथरा धरण परिसर गाठले आहे. तिच्या मागावर वनकर्मचाºयांचा ताफा असून सद्यस्थितीत झुणका, पोथरा प्रकल्पाच्या परिसरात ती असल्याचे वनविभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले.