शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवादी संघटनांकडून महाराष्ट्र दिनी निषेध

By admin | Updated: May 2, 2016 02:06 IST

येथील विदर्भवादी संघटनांकडून रविवारी महाराष्ट्र दिन हा काळा दिन म्हणून पाळण्यात आला. काळ्या फिती लावून यावेळी

वर्धा :येथील विदर्भवादी संघटनांकडून रविवारी महाराष्ट्र दिन हा काळा दिन म्हणून पाळण्यात आला. काळ्या फिती लावून यावेळी शासनाविरोधी घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला. सकाळी १० वाजताच्या शिवाजी चौक येथून मोर्चा काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात अभिवादन करून विदर्भाचा झेंडा फडकावित मोर्चाचा समारोप करण्यात आला. त्यानंतर महात्मा गांधी पुतळ्याजवळ भारतीय जनता पक्षाच्या जाहिरनाम्याची होळी करण्यात आली. महाराष्ट्र दिनी विदर्भवादी संघटनांकडून विदर्भाचा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ठरलेल्या कार्यक्रमानुसार सकाळी सर्वच संघटनांचे पदाधिकारी शिवाजी चौक परिसरत एकत्र आले. येथे उपस्थित सर्वच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या बळकटी देण्यासंदर्भात आपली भूमिका विषद केली. यानंतर मोर्चा काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.महात्मा गांधी चौकात जाळला जाहिरनामा ४निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने त्यांच्या जाहिरनाम्यात वेगळा विदर्भ देण्यासंदर्भात घोषणा केली होती. मात्र आता वास्तवात तसे होताना दिसत नाही. यामुळे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत विदर्भवादी संघटनांच्यावतीने आंदोलनाची भूमिका विषद करताना दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास भाजपाचा निवडणूक जाहीरनामा जाळला. यावेळी शहर पोलिसांनी आंदोलकांना आंदोलनस्थळावरून ताब्यात घेत शहर ठाण्यात आणले. येथे सुमारे तासभर त्यांना स्थानबद्ध करून सोडण्यात आले. सेलूतही निदर्शने ४सेलू येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या ध्वजारोेहणाच्यावेळी नगरसेवक शैलेंद्र दप्तरी, रामनारायण पाठक, किसान अधिकार अभियानचे सुदाम पवार आणि विदर्भ राज्याच्या समर्थकांनी विदर्भ राज्याकरिता घोषणा देत महाराष्ट्र दिनाचा निषेध नोंदविला.