युवतीची छेड काढून घरावर दगडफेक

By Admin | Updated: September 23, 2016 02:22 IST2016-09-23T02:22:30+5:302016-09-23T02:22:30+5:30

शिकवणी वर्गाला आणि महाविद्यालयात जाताना युवतीचा दुचाकीने पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घातली.

The victim of ruckus and rocks at home | युवतीची छेड काढून घरावर दगडफेक

युवतीची छेड काढून घरावर दगडफेक

ज्ञानेश्वरनगरातील घटना : तिघांविरूद्ध गुन्हे दाखल
वर्धा : शिकवणी वर्गाला आणि महाविद्यालयात जाताना युवतीचा दुचाकीने पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घातली. युवतीने नकार दिल्यामुळे युवकाने त्याच्या साथीदारासह तिच्या घरावर दगडफेक करून युवतीच्या आजीला व वडिलाला मारहाण केली. ही घटना ज्ञानेश्वर नगर म्हसाळा येथे बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
पीडिताने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून मिथून चहांदे, त्याचा जावई मंगेश रा. ज्ञानेश्वर नगर व बाप्या नावाच्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिथून परिसरातील १६ वर्षीय युवतीचा नियमित पाठलाग करून तिच्यावर प्रेम करीत असल्याचे सांगून तिला वारंवार त्रास देत होता. मुलीने हा प्रकार तिच्या आजीला सांगितला. तिच्या आजीने मिथूनला हटकले असता त्याने साथीदारांना घेवून तिच्या घरावर हल्ला केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
मुलीच्या वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण केली. या याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरून या तिघांवर भादंविच्या कलम ३२४, ३५४, ३३६, ४४८, २९४, ५०६ व पोक्सो सहकलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The victim of ruckus and rocks at home