शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजविण्याकरिता वर्धेकरांची गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

शहरात अमृत योजनेंतर्गत भूमिगत पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेच्या कामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. ठिकठिकाणी खोदकाम केले असून ते बुजविण्याकरिता कंत्राटदाराची डोळेझाक होत आहे. पालिकाही यासंदर्भात बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे आंदोलन व मोर्चा काढण्यापेक्षा वर्धेकरांनी शहरात फलक लावून गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे.

ठळक मुद्देशहरात लावले फलक : करदात्यांनी नगरपालिकेचे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात अमृत योजनेंतर्गत भूमिगत पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेच्या कामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. ठिकठिकाणी खोदकाम केले असून ते बुजविण्याकरिता कंत्राटदाराची डोळेझाक होत आहे. पालिकाही यासंदर्भात बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे आंदोलन व मोर्चा काढण्यापेक्षा वर्धेकरांनी शहरात फलक लावून गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे.शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून अमृत योजनेेंतर्गत भूमिगत पाणीपुरवठा योजना व मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. प्रारंभी पाणी पुरवठा योजनेकरिता शहरातील रस्त्याच्या बाजुने तर कुठे मधात खोदकाम करण्यात आले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पालिकेने लाखो रुपये खर्च करुन लावलेले पेव्हींग ब्लॉक निरुपयोगी ठरले. त्यानंतर मलनिस्सारण योजनेकरिता सहा महिन्यांपूर्वी बांधलेले सिमेंटचे रस्ते मधातून खोदण्यात आले. हे खोदकाम वर्धेकरांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे.यात चिमुकल्याचा नाहक बळी गेला असून अनेकांना अपघातही सहन करावे लागत आहे. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने शहरातील काही भागातील परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. शास्त्री चौक ते बजाज चौकपर्यंतच्या रस्त्याची अवस्था फार वाईट असून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.या मार्गावर रेल्वेस्थानक असून महामंडळाचे आगार, सिंदी(मेघे), उमरी (मेघे), रसुलाबाद, नागठाणा, वायफड व शांतीनगर परिसरात जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. तरीही या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता अद्याप पुढाकार घेतला नाही. त्यामुळे समस्याग्रस्त करदात्यांनी या मार्गावर ‘वर्धा नगर परिषद, कृपा करून हे खड्डे आणि रस्ता दुरूस्त करावा, ही नम्र विनंती. आपला एक प्रामाणिक करदाता वर्धेकर.’ अशा आशयाचे फलक लावून पालिकेचे लक्ष वेधले आहे. आता ही गांधीगिरी नगरपालिका प्रशासनासह तेथील लोकप्रतिनिधींना कितपत पचणी पडते, याकडे वर्धा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा