परड्याच्या दिंडीला माऊली रथामागे जाण्याचा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2015 00:25 IST2015-08-06T00:25:18+5:302015-08-06T00:25:18+5:30
ज्ञानराज माऊली कृपा प्रासादिक दिंडीला १३ वर्षांत माऊली रथामागे जाण्याचा मान मिळाला आहे. आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त आळंदी ते पंढरपुर पायदळ...

परड्याच्या दिंडीला माऊली रथामागे जाण्याचा मान
१३ वर्षांत प्रथमच बहुमान : ज्ञानराज माऊली कृपा प्रासादिक दिंडीची परतवारी
सेलू : ज्ञानराज माऊली कृपा प्रासादिक दिंडीला १३ वर्षांत माऊली रथामागे जाण्याचा मान मिळाला आहे. आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त आळंदी ते पंढरपुर पायदळ वारीसाठी निघालेली ज्ञानराज माऊली कृपा प्रासादिक दिंडी परतवारी करून जिल्ह्यात सोमवारी परतली.
संकट मोचन हनुमान मंदिर परडा येथून आषाढ वैद्य पंचमीला वारीचे प्रस्थान झाले होते. या दिंडीचे हे १४ वे वर्ष आहे. यात विदर्भातील सर्व जिल्ह्यातील वारकरी व दिंड्या सहभागी झाल्या होत्या. माऊली रथामागे जाण्याचा सन्मान मिळविणे भूषणावह असते. या दिंडीला दोन हजारावे स्थान मिळाले होते. यंदा प्रथमच दिंडीला २२१ वा क्रमांक देण्यात आला आहे.
आषाढ वैद्य अष्टमी ला ज्ञानेश्वर महाराज मंदिर, आळंदी (देवाची) येथून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथामागे दिंडी व पायदळ वारींचा प्रवास सुरू झाला. १८ दिवस पायदळ वारी करून दिंडी पंढरपूर येथे पोहचली. पायदळ वारीचा प्रवास करताना ही दिंडी आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद असा प्रवास केला. दिंडी समोर पताका, तुळशी वृंदावन व विठ्ठल नामाचा गजर करीत पायी चालणारे वारकरी ज्ञानराज माऊली, तुकाराम असा गजर करत अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने वारीत वाटचाल करीत होते. या दिंडीत वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर व नागपूर येथील वारकरी सहभागी होते.
वारकरी यांच्याकरिता नि:शुल्क सेव देण्यात आल्या. ज्ञानराज माऊली कृपा प्रासादिक दिंडीचे विणेकरी पांडुरंग महाराज जगधरे, दिंडीप्रेरक गुरूवर्य पुंडलिक महाराज बोळवटकर, दिंडीचे व्यवस्थापक लक्ष्मण कुबडे, अजय महाराज डेहणे, अविनाश भोयर, दिंडीचे चालक प्रकाश महाराज चंदनखेडे, रूपदेव महाराज धोटे यांचा प्रमुख सहभाग होता. ही दिंडी गावाला परतल्यावर सहभागी वारकरी व मार्गदर्शक यांचा ग्रामस्थांच्यावतीने सन्मान केला.(तालुका प्रतिनिधी)