शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

शेती हंगामातच दुसरा डोस आल्याने लसीकरण मंदावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

कोविड मृत्यू रोखण्यासाठी लाभार्थ्यांना दिली जात असलेल्या दोन्ही लसी परिणामकारकच आहेत. लस घेतलेल्या व्यक्तीला कोविडचा संसर्ग झाला तरी बहुतांश व्यक्तींवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही. शिवाय कोविडला हरविण्यासाठी तसेच त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सध्या लस हाच उत्तम पर्याय असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात; पण सध्या शेतीच्या कामांनाही शेतकरी व शेतमजूर गती देत आहेत. 

ठळक मुद्देग्रामीण भागातील अडचण : शेतीकामे सोडून येणे नागरिकांना कठीणच

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असली तरी देवळी तालुक्यातील ग्रामीण भागात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लसीकरणाला सुरुवात झाली. लसीच्या दोन डोसमध्ये काही विशिष्ट अंतर ठेवण्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत असले तरी सध्या शेतकरी व शेतमजूर शेतीच्या कामांना प्राधान्य देत असल्याने याचा विपरीत परिणाम सध्या लसीकरण मोहिमेवर होत आहे. पहिले लस घ्यावी की शेतीचे काम झटपट पूर्ण करावे, अशी द्विधा मन:स्थिती सध्या शेतकरी व शेतमजुरांची आहे.कोविड संकटाच्या काळात शेती याच व्यवसायाने जिल्ह्याचे अर्थचक्र पूर्ण पदावर आणण्यासाठी मोठा हातभार लावला. तर कोविड मृत्यू रोखण्यासाठी लाभार्थ्यांना दिली जात असलेल्या दोन्ही लसी परिणामकारकच आहेत. लस घेतलेल्या व्यक्तीला कोविडचा संसर्ग झाला तरी बहुतांश व्यक्तींवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही. शिवाय कोविडला हरविण्यासाठी तसेच त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सध्या लस हाच उत्तम पर्याय असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात; पण सध्या शेतीच्या कामांनाही शेतकरी व शेतमजूर गती देत आहेत. अशातच पूर्वी लस घ्यावी की शेतीची कामे करावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना सतावत आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच जर ग्रामीण भागात लसीकरण पूर्ण झाले नाही तर ग्रामीण भागातील नागरिकांना कोविडचा सामना करावा लागणार आहे. लस घेतल्यावर काहींना ताप येतो. त्यामुळे लस घेतल्यावर विश्रांती गरजेची असते; पण ऐन लागवडीच्या हंगामात लस घेऊन विश्रांती करणे हे न परवडणारे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या लसीकरण मोहिमेवर याचा परिणाम होत आहे.

शहरात लसीचा पुरेसा पुरवठा नाही

- लसीकरणाची मोहीम गतीने सुरू असली तरी अनेक केंद्रांवर लसीचा पुरेसा पुरवठा नाही. त्यामुळे नागरिकांना आल्यापवलीच निराश होऊन परतावे लागत आहे. तर ग्रामीण भागात खरीप हंगामातील शेतीची कामे जोरात सुरू आहेत. अनेक ठिकाणी पावसाने दडी मारलेली असल्याने शेतकरीबांधवांना ओलित करण्यास जावे लागत आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर अद्याप लसीकरणासाठी सरसावलेले नाहीत. यामुळे लसीकरण केंद्रांवर फारशी गर्दी दिसून येत नाही. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या