शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ओलितासाठी आता ट्रॅक्टरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:47 IST

कृषीपंपाकरिता असलेले भारनियमनाचे वेळापत्रक शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. वारंवार मागणी करुनही यात बदल होत नसल्याने पिकांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी वेगळी शक्कल लढविली.

ठळक मुद्देभारनियमनावर शेतकºयांची शक्कल : ट्रॅक्टरचलित वीजनिर्मिती यंत्र

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : कृषीपंपाकरिता असलेले भारनियमनाचे वेळापत्रक शेतकºयांना त्रासदायक ठरत आहे. वारंवार मागणी करुनही यात बदल होत नसल्याने पिकांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी वेगळी शक्कल लढविली. घोराड येथे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचलित वीजनिर्मिती यंत्राचा वापर करून ओलित केले. यात वेळेची बचत होत असली तरी ओलिताचा खर्च मात्र वाढला आहे.ट्रॅक्टरचलित यंत्रावर ५, ३, ७.५ ते २ अश्वशक्ती मर्यादा असलेले विद्युतपंप कार्य करतात. यावर ६० स्प्रींकलरचे नोझलने सिंचन करता येते. कमी वेळात जास्त ओलित करणे शक्य होत आहे. दिवसाला ३ ते ४ एकरातील ओलित येथील शेतकरी करू लागला आहे. याकरिता शेतकºयाला ५ हजार रूपये खर्च येतो. ज्या शेतकºयाकडे स्वत:च्या मालकीचा ट्रॅक्टर आहे त्याला दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो. हा सर्व खटाटोप करुन शेतकरी ओलित करीत असला तरी शेतकºयांना खर्च परवडणारा नाही.भारनियमनाचे वेळापत्रक गैरसोयीचे आहे. रात्रीचे ओलीत करताना शेतकºयांना अडचण येते. कधी ब्रेकडाऊन तर कधी वीज पुरवठा खंडित होतो. वारंवार खंडित होणाºया वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. यामुळे ओलिताकरीता दिलेली मजुरी वाया जाते. एकीकडे मजुरीचे वाढलेले दर आणि भारनियमनातील अनियमितता यामुळे ओलिताकरिता हे यंत्र विकत घेतले, असे शेतकरी सांगतात.पाण्याचा मुबलक साठा आवश्यकया यंत्राद्वारे ओलित करताना विहिरीला पाण्याचा मुबलक साठा असणे आवश्यक आहे. ज्यामुळे जास्तीतजास्त ओलित करता येते. रस्त्यापासून विहीर, नाला, नदी दूर असली तरी ट्रॅक्टर दुरवर उभा ठेवून ओलित करणे शक्य आहे.भारनियमनामुळे शेताचे ओलित करणे कठीण झाले. ट्रॅक्टर घरचाच होता. त्यावर वीजनिर्मिती यंत्र बसविले. याकरिता ८० ते ९० हजार रूपये खर्च आला. अशापद्धतीने पहिल्यांदाच ओलित केले. ते खर्चिक असले तरी वेळेची बचत व वेळेवर ओलित करणे शक्य झाले.- विवेक धोंगडे, युवा शेतकरी, घोराड.

टॅग्स :Farmerशेतकरी