शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जिल्ह्यातील १७ ग्रा.पं.मधील पाणी पिण्यास अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:15 IST

पावसाळ्याच्या दिवसात दुषित पाणी पिल्यामुळे सर्वाधिक राथरोगांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील ५१४ ग्रा. पं. पैकी ४९७ गावांमधील पाणी पिण्यायोग्य असल्याचे जि.प.च्या एका सर्वेक्षणात पुढे आले आहे.

ठळक मुद्देस्त्रोतांना अस्वच्छतेचा विळखा : ग्रा.पं. प्रशासनाकडून कार्यवाहीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्याच्या दिवसात दुषित पाणी पिल्यामुळे सर्वाधिक राथरोगांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील ५१४ ग्रा. पं. पैकी ४९७ गावांमधील पाणी पिण्यायोग्य असल्याचे जि.प.च्या एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. इतकेच नव्हे तर १७ गावांमधील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांना अस्वच्छतेचा विळखा असल्याचे या पाहणीत पुढे आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे निरोगी आरोग्य या हेतूला केंद्रस्थानी ठेवून त्या-त्या ग्रा.पं. प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात ७४ ग्रा.पं., देवळीमध्ये ६३, सेलू ६२, आर्वी ६९, आष्टी ४१, कारंजा (घा.) ५९, हिंगणघाट ७६ तर समुद्रपूर तालुक्यात ७० ग्रा. पं. आहेत. या ५१४ ग्रा. पं. मध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे एकूण २ हजार ८८६ स्त्रोत आहेत. या स्त्रातातील पाणी त्या-त्या गावातील ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात. ज्या स्त्रोताचे पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात त्या स्त्राताच्या परिसरात अस्वच्छता नसने क्रमप्राप्त आहे; पण सध्यास्थितीत जिल्ह्यातील एकूण १७ ग्रामपंचायतीतील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांना अस्वच्छतेचा विळखा आहे. यात देवळी तालुक्यातील पाच, सेल पाच, आर्वी सहा तर आष्टी तालुक्यातील एका गावाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. सदर गावांमधील लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देत तात्काळ योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. तर नागरिकांनीही पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी उकळून थंड करूनच तसचे चाळून पिणे गरजेचे आहे.१७ ग्रा.पं.तील पाण्याच्या स्त्रोतांना ग्रिनकार्डजिल्ह्यातील ३४ ग्रामपंचायतीतील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या आवारात अस्वच्छता दिसून असल्याने जि.प.च्या पाणी पुरवठा विभागाने त्या पाण्याच्या स्त्रोताबाबत संबंधित ग्रा.पं.ना पिवळे कार्ड दिले होते. त्यानंतर जि.प. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांना केंद्रस्थानी ठेवून सदर ग्रा.पं.तील काही ग्रा.पं.नी योग्य उपाययोजना केल्याने त्यापैकी १७ ग्रा.पं.ना ग्रिन कार्ड देण्यात आले आहे.मनुष्याच्या शरीरात ६० टक्के पाणीचपृथ्वी तलावरील केवळ ३ टक्केच पाणी पिण्यायोग्य आहे. इतकेच नव्हे तर मनुष्याच्या शरीर वजनाच्या ६० टक्के वजन हे पाण्याचे असते. पेशी जीवंत ठेवणे, शरीरातील द्रव्य पदार्थांचे वहन, अन्नाचे चयपचाय, शरीराचे तापमान थंड ठेवणे, उत्सर्जन ही पाण्याची प्रमुख कार्ये असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात रोगजंतू, पाण्याला दुर्गंधी तसेच रसायनिक प्रदुषक नसावे, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण