शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात मतदानाला सुरुवात, मतदारांची केंद्रांवर गर्दी
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

चाकूच्या धाकावर रोख रक्कम पळविणारे दोघे तरूण जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 5:00 AM

गोपयीन माहितीच्या आधारे हिंगणघाट पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे शेखर डोंगरे व त्यांच्या सहकार्यांनी रिमडोह शिवारातून दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी रोहित उर्फ रितेश जगन्नाथ डेकाटे (१९) व सायमन अ‍ॅन्थोनी फ्रान्सीस (१९) दोन्ही रा. सुयोगनगर अजनी, नागपूर यांना अटक केली आहे.

ठळक मुद्देहिंगणघाट पोलिसांची कामगिरी : नागपूर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांची दिली कबुली

    लाेकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : चाकूच्या धाकावर रोख पळविणाऱ्या चाेरट्यांना हिंगणघाट पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये हुडकून काढत अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनीचोरीचा मुद्देमाल जप्त केला असून या चोरट्यांनी नागपूर जिल्ह्यात केलेल्या एका चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.प्राप्त माहितीनुसार, राजकुमार अशोक गौळकार रा. शास्त्री वॉर्ड हिंगणघाट हे दुचाकीने रेल्वे उड्डाण पुलावरून शासकीय रुग्णालय चौककडे जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना वाटेत अडविले. हे अज्ञात व्यक्ती इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी जवळ असलेल्या चाकूचा धाक दाखवत राजकुमार यांच्या जवळील दोन हजारांची रक्कम हिस्कावून पळ काढला. त्यानंतर रामकुमार यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला सुरूवात केली. गोपयीन माहितीच्या आधारे हिंगणघाट पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे शेखर डोंगरे व त्यांच्या सहकार्यांनी रिमडोह शिवारातून दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी रोहित उर्फ रितेश जगन्नाथ डेकाटे (१९) व सायमन अ‍ॅन्थोनी फ्रान्सीस (१९) दोन्ही रा. सुयोगनगर अजनी, नागपूर यांना अटक केली आहे. या चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास नागपूर जिल्ह्यात एअरपोर्ट चौक नागपूर येथेही चाकूच्या धाकावर रेाख व मोबाईल पळविल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. ही कारवाई एसपी प्रशांत होळकर, एसडीपीओ भीमराव टेळे, ठाणेदार पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात शेखर डोंगरे, नीलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, उमेश बेले यांनी केली.

चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही चक्क चोरीचीचअधिक चौकशीदरम्यान या चोरट्यांनी नागपूर जिल्ह्यातील एका चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. विशेष म्हणजे या चोरट्यांनी चोरीच्या दुचाकीचा वापर गुन्ह्यात केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. दुचाकी चोरीबाबत बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

दोघे नागपूर शहरातील सराईत गुन्हेगारअटक केलेले दोन्ही तरुण हे नागपूर शहरातील सराईत गुन्हेगार असल्याचे हिंगणघाट पोलिसांच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे. त्यांच्याकडून एकूण ७० हजार ५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस