शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांचा राधे दाखवतो नकाशावरील ३१ देश

By admin | Updated: August 15, 2015 02:08 IST

एकविसाव्या शतकात इंटरनेटसारख्या वेगवान माध्यमामुळे जग आणखी जवळ आलं आहे.

बुद्धिमत्तेची चुणूक : अद्याप त्याला शब्दांची पुरती ओळखही नाही पराग मगर  वर्धाएकविसाव्या शतकात इंटरनेटसारख्या वेगवान माध्यमामुळे जग आणखी जवळ आलं आहे. असे असतानाही या जगात देश किती हा प्रश्न एखाद्याने आपल्याला विचारला तर बोटावर मोजता येतील एवढे देशही आपण सांगू शकणार नाही. पण वर्धेतील दोन वर्षांचा चिमुकला राधे नकाशावरील लहान मोठे ३१ देश ओळखून दाखवितो. शब्दांची व रंगांचीही पूर्णत: ओळख नसलेला राधे हे कसे करतो हे एक कोडेच असून यातून त्याची असामान्य बुद्धिमता प्रत्ययास येते.राधे विक्रांत रोटकर हा केवळ दोन वर्षांचा मुलगा. अद्याप स्पष्ट बोलणही त्याला जमत नाही. इंग्रजीचे ए बी सी डी हे चारच शब्द त्याला थोडेफार कळतात. त्याचे वडील विक्रांत रोटकर हे पेशाने तंत्रज्ञान विषयाचे प्राध्यापक. त्यांचा भुगोल विषय तसा कच्चाच. पण अवकाश ज्ञानाची मोठी आवड. आपल्या मुलाला भारत देश तरी कळावा या माफक अपेक्षेने त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना ‘ग्लोब’ विकत आणला आणि मुलगा राधे याला भारत देश त्यात दाखविला. त्या दिवसापासून राधे दररोज न चुकता वडील घरी आले की त्यांना त्या ग्लोबवर भारत दाखवायचा. त्यामुळे आवड बघून त्यांनी स्वत: अभ्यास करून मुलाला वेगवेगळे देश दाखवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे अल्प काळातच तो झपाट्याने ग्लोब वरील सर्व नकाशे दाखवू लागला. आज तब्बल ३१ देश राधे कधीही केव्हाही विचारले तरी ग्लोबवर अचूक दाखवितो. जगाच्या नकाशावर असलेले देश एखाद्याने सांगितल्यावर शोधणे मोठ्या माणसांनाही सांगणे कठीण जाते; परंतु राधे लहानातला लहान देश अचूक दाखवितो. नकाशावर असलेल्या देशांच्या रंगांमध्ये खूप फरक नाही आणि अक्षरज्ञानही नसल्याने राधे एवढे सगळे देश लक्षात ठेवतो कसे हे कोडेच आहे. अद्याप शब्दांची ओळखही नाहीराधेला अद्याप शब्दांची ओळखही नाही. रंगांचे ज्ञान असले तरी ग्लोबवर बरेचसे देश हे समान रंगानीच दाखविले आहे. फरक आहे तो केवळ आकारांचा. आजघडीला राधे ग्लोबवरील भारत, चीन, रशिया, मंगोलिया, कजाकिस्तान, श्रीलंका, अलास्का, आॅस्टे्रलिया, पेरू, ब्राझिल, मादागास्कर, न्युझिलंड, फिलिपाईन्स, जर्मनी, स्पेन, फ्रान्स, पोलंड, ग्रीनलँड, मेक्सिको, अल्जेरिया, थायलंड, अर्जेंटिना, अंटार्टिका, लिबिया, कोलंबिया, उत्तर अमेरिका, द. अमेरिका, क्युबा, सोमानिया आणि इजिप्त हे देश ओळखतो. अद्याप यातील अनेक देश मुलांच्या गावीही नसताना राधे हे देश कुठल्याही क्रमाने विचारले तरी सांगतो. अद्याप शब्दांची ओळखही नाहीराधेला अद्याप शब्दांची ओळखही नाही. रंगांचे ज्ञान असले तरी ग्लोबवर बरेचसे देश हे समान रंगानीच दाखविले आहे. फरक आहे तो केवळ आकारांचा. आजघडीला राधे ग्लोबवरील भारत, चीन, रशिया, मंगोलिया, कजाकिस्तान, श्रीलंका, अलास्का, आॅस्टे्रलिया, पेरू, ब्राझिल, मादागास्कर, न्युझिलंड, फिलिपाईन्स, जर्मनी, स्पेन, फ्रान्स, पोलंड, ग्रीनलँड, मेक्सिको, अल्जेरिया, थायलंड, अर्जेंटिना, अंटार्टिका, लिबिया, कोलंबिया, उत्तर अमेरिका, द. अमेरिका, क्युबा, सोमानिया आणि इजिप्त हे देश ओळखतो. अद्याप यातील अनेक देश मुलांच्या गावीही नसताना राधे हे देश कुठल्याही क्रमाने विचारले तरी सांगतो. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते. हाच प्रकार राधे बाबत दिसत असल्याचे दिसते. तबला म्हणजे नेमके काय हे देखील नीट माहिती नसलेला राधे गाण्याच्या तालावर तबल्याचा अचूक ठेका धरतो. त्याच्या वडिलांनी तबला वादनाच्या काही चित्रफिती त्याला दाखविल्या असता तो तशाच प्रकारचा तबला वाजविण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट पाहताक्षणीच त्याला लगेच आत्मसाद करण्याचा राधे चा कसब साऱ्यांना आश्चर्यचकित करणारा आहे.