दुचाकी चोरटा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:16+5:30
निक पोलिसांनी नाकेबंदी करून दुचाकी चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची एक दुचाकी जप्त केली आहे. पंकज राजेंद्र मारवे (३५) रा. स्वीपर कॉलनी, हिंगणघाट, असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस कर्मचारी सुनील पाऊलझाडे, निलेश तेलरांधे, पंकज घोडे व सचिन भारशंकर यांना एक संशयीत इसम चोरीची दुचाकी घेऊन पळ काढत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे त्यांनी वर्धा मार्गावर नाकेबंदी करून पंकज मारवे याला ताब्यात घेतले.

दुचाकी चोरटा जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : स्थानिक पोलिसांनी नाकेबंदी करून दुचाकी चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची एक दुचाकी जप्त केली आहे. पंकज राजेंद्र मारवे (३५) रा. स्वीपर कॉलनी, हिंगणघाट, असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस कर्मचारी सुनील पाऊलझाडे, निलेश तेलरांधे, पंकज घोडे व सचिन भारशंकर यांना एक संशयीत इसम चोरीची दुचाकी घेऊन पळ काढत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे त्यांनी वर्धा मार्गावर नाकेबंदी करून पंकज मारवे याला ताब्यात घेतले.
अधिक विचारपूस दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची एक दुचाकी जप्त केली आहे. शिवाय त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे, सत्यविर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात सुनील पाऊलझाडे, निलेश तेलरांधे, पंकज घोडे व सचिन भारशंकर यांनी केली.