दोन भावंडांनी जोपासली ४०० कडुनिंबाची झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:00:24+5:30
मातीच्या बंधाऱ्यात जमा झालेले वेगळेच. हा बंधारा ओव्हर फ्लो झाल्यावर हे पाणी सरळ नदीत जाते. या दोन भावंडांनी वेस्ट वॉटरमधून बेस्ट कसे करायचे. याचा निर्धार मनाशी पक्का करुन वाया जाणाऱ्या पाण्याची बचत केली आहे. धनोडी गाव परिसरात आणि अहिरवाडा परिसरात मागील चार वर्षांपासून दर पावसाळ्यात ही दोन भावंड १०० वृक्षांची लागवड करतात. या संकल्पाचे हे चौथे वर्ष असून आतापर्यंत तब्बल ४०० झाडांची लागवड त्यांनी केली आहे.

दोन भावंडांनी जोपासली ४०० कडुनिंबाची झाडे
राजेश सोळंकी।
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : पावसाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जाते. मात्र, ज्यांना त्याची जाणीव असते त्यांनाच त्याची किंमत कळते. दरवर्षी हजारो लिटर पाणी वाया जाताना पाहून आर्वी तालुक्यातील धनोडी (नांदपूर) येथील प्रवीण देशमुख आणि नीलेश देशमुख या दोन भावंडांनी अभिनव पद्धतीने स्वखर्चातून बंधारा बांधून सुमारे दहा लाख लिटर पाणी अडविले. इतकेच नव्हे तर दरवर्षी परिसरात १०० कडुनिंबाचे वृक्ष लावून त्यांनी आतापर्यंत ४०० वृक्ष जगविले. त्या दोन भावडांची जिद्द आणि चिकाटी अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.
आर्वी तालुक्यातील धनोडी गावानजीक मार्गावर शासकीय पडीक जागा आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळयात पाणी जमा होते. हे वाया जाणारे पाणी उपायोगात कसे आणायचे. हाच ध्यास मनात धरुन प्रवीण आणि नीलेश देशमुख यांनी धनोडी-अहिरवाडा मार्गावर एक छोटा बंधारा बांधला. त्यात पाईप टाकून छोटे टाके बांधले. वाया जाणारे पाणी पाईपद्वारे टाक्यातून बंधाऱ्यात जमा होते. बंधारा भरल्यावर दुसऱ्या मातीच्या बंधाऱ्यात पाणी जाते. जवळपास दहा लाख लिटर पाणी स्वखर्चातून बांधलेल्या बंधाऱ्यात जमा होत आहे. मातीच्या बंधाऱ्यात जमा झालेले वेगळेच. हा बंधारा ओव्हर फ्लो झाल्यावर हे पाणी सरळ नदीत जाते. या दोन भावंडांनी वेस्ट वॉटरमधून बेस्ट कसे करायचे. याचा निर्धार मनाशी पक्का करुन वाया जाणाऱ्या पाण्याची बचत केली आहे. धनोडी गाव परिसरात आणि अहिरवाडा परिसरात मागील चार वर्षांपासून दर पावसाळ्यात ही दोन भावंड १०० वृक्षांची लागवड करतात. या संकल्पाचे हे चौथे वर्ष असून आतापर्यंत तब्बल ४०० झाडांची लागवड त्यांनी केली आहे. तसेच लावलेल्या झाडांचे संगोपनही न चुकता त्यांच्याकडून केल्या जात आहे. वसुंधरेच्या प्रेमाची ‘सुजलाम सुफलाम’ भावना अनेकांना प्रेरणा देऊन मोहित करणारी ठरत आहे.