शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन लाख खातेधारक शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

वर्धा जिल्ह्यात सुमारे २ लाख ४८ हजार ३८१ खातेधारक शेतकरी असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. असे असले तरी अद्यापही जिल्हा प्रशासनाला लेखी सूचना प्राप्त झालेल्या नाही. त्यामुळे नेमके किती शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरेल हे सध्या अस्पष्ट आहे. तर लेखी आदेशाची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे.

ठळक मुद्देकर्जमाफीची घोषणा झाली; पण लेखी आदेशाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनादरम्यान केली आहे. वर्धा जिल्ह्यात सुमारे २ लाख ४८ हजार ३८१ खातेधारक शेतकरी असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. असे असले तरी अद्यापही जिल्हा प्रशासनाला लेखी सूचना प्राप्त झालेल्या नाही. त्यामुळे नेमके किती शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरेल हे सध्या अस्पष्ट आहे. तर लेखी आदेशाची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे.कुठल्याही अटी व शर्ती विना राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे येत्या मार्च महिन्यापासून कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाणार आहे. लेखी आदेशच प्राप्त न झाल्याने जिल्हा प्रशासनातील विविध विभाग सध्या संभ्रमात आहे. कर्जमाफीचा लाभ घेणाºया शेतकऱ्याचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे. शिवाय ते आधारशी संलग्न असणेही क्रमप्राप्त आहे. शेतकºयाच्या अंगठ्याचा ठसा घेत त्याला कर्जमाफीचा लाभ दिल्या जाईल असे सांगण्यात येत आहे. असे असले तरी लेखी सूचना प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीचा लाभ देण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.मागील सरकारने दिला ९०,६६५ शेतकऱ्यांना लाभफडणवीस सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून त्यांची अंमलबजावणी करण्यात आली. त्यावेळी वर्धा जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी १ लाख ४० हजार ५५३ शेतकऱ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरले होते. त्यापैकी केवळ ९० हजार ६६५ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. तर ४३ हजार ८२७ शेतकºयांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते. तर नवीन ठाकरे सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाचा गांधी जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.अपात्र ठरविलेल्या शेतकºयांच्या अर्जावर होतोय पुर्नविचारविविध कारणे पुढे करून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचे आरोप होताच तालुकास्तराव समिती गठीत करण्यात आली. शिवाय सदर समितीकडून प्राप्त झालेल्या तसेच अपात्र ठरविलेल्या शेतकºयांच्या अर्जाच्या कागदपत्राची पडताळणीकरून पुर्नविचार केल्या जात आहे. त्याबाबतचा अहवाल तालुका समितींनी अजूनही जिल्हा प्रशासनाला सादर केलेला नसल्याचे सांगण्यात येते.फडणवीसांच्या काळात दीड तर ठाकरेंच्या काळात दोन लाखतत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात कर्जबाजारी शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ करून दिलासा देण्यात आला. तर शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी