शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

कार-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:30 IST

येथील महामार्ग ६ वरील पेट्रोलपंपा समोर कार व दुचाकीच्या अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन ठार व एक गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहामार्ग ६ वरील घटना : एका जखमीवर नागपूरात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : येथील महामार्ग ६ वरील पेट्रोलपंपा समोर कार व दुचाकीच्या अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन ठार व एक गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात दुपारी चार वाजता झाला असून कार मधील पाच प्रवासी थोडक्यात बचावले.प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ३२ एच. ९५२४ क्रमांकाच्या दुचाकीने तिघे जण कारंजाकडून महामार्गावरील पेट्रोलपंपावर वाहनात इंधन भरण्यासाठी जात होते. पेट्रोलपंप उजव्या बाजूला असल्याने दुचाकी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन उजवीकडे वळविली असता कोंढाळीकडून येणाऱ्या एम. एच. ३२ सी.९०२४ क्रमांकाच्या कारने दुचाकीला जबर धडक दिली. अपघात होताच कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कार रस्त्याकडेला असलेल्या शेतात घूसली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला व कारचेही नुकसान झाले. या अपघातात दुचाकीवरील अमोल दुपारे (२४) रा इंदिरानगर कारंजा याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या सोनू उर्फ अमर श्रीरामे (२५) व सतीश कालभूत (२४) रा. सेलगाव याला सुरूवातीला कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती सोनू उर्फ अमर श्रीराम याला वैद्यकीय अधिकाºयांनी मृत घोषित केले. तर सतीश याची प्रकृती नाजूक असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. लक्ष्मण भलावी, मनिषा लक्ष्मण भलावी, मुलगाव अभय (११), मुलगी नंदीनी (९) व बहिण कविता सलाम (४०) हे कार मध्ये होते. ते एका घरगुती कार्यक्रमासाठी शिवा (अडेगाव) ता. काटोल येथून आष्टीला बहिणीकडे जात होते. दरम्यान हा अपघात झाला असून ते थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची नोंद कांरजा पोलिसांनी घेतली आहे.ट्रकने दुचाकी चालकास चिरडलेवर्धा : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. हा अपघात शहरानजीकच्या शांतीनगर चौकात शुक्रवारी सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास झाला. माधव हनुमान ठाकरे (२४) रा. उमरी (मेघे) असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार, मृतक माधव ठाकरे व रामदास चरडे रा. उमरी हे कामासाठी वर्धेच्या दिशेने जात होते. सायकने वर्धा शहरात पोहोचलेला रामदास चरडे भरपूर वेळ होऊनही माधव न पोहोचल्याने आणि त्याच्याशी मोबाईलवर संपर्क न होत असल्याने पुन्हा गावाच्या दिशेने निघाला. त्यावेळी त्याला शांतीनगर परिसरात अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्याने बारकाईने पाहणी केली असता माधव हा जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याने दिसून आले. त्याने घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देताच सहाय्यक फौजदार शंकर भलावी यांनी आपल्या चमुसह घटना स्थळ गाठून जखमीला मिळेल त्या वाहनाने सावंगी रुग्णालयाकडे रवाना केले. तेथे उपचारादरम्यान माधवचा मृत्यू झाला. माधव हा एम.एच. ३२ व्ही. ४९८० क्रमांकाच्या दुचाकीने वर्धेकडे येत असता त्याला भरधाव असलेल्या डब्ल्यू. बी. १५ बी. ७३४९ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू