शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

चिमुकल्यांनी केले दुष्काळाशी दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:09 AM

कारंजा तालुक्यातील भिवापूर हे गाव दुष्काळाचे चटके सोसत असतांना तिथल्या आठ ते दहा चिमुकल्या पोरांनी हातात कुदळ, फावडे घेऊन काम सुरू केले. हाताला फोड आली... लोक हसली... वेड्यात काढलं... पण लहान हातांनी जिद्दीने जे काम केलं ते गावातील मोठी माणस करू शकली नाही.....!

ठळक मुद्देगायमुख येथे अनेक कामे, खडका गावांत रात्री झाला श्रमदानाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा तालुक्यातील भिवापूर हे गाव दुष्काळाचे चटके सोसत असतांना तिथल्या आठ ते दहा चिमुकल्या पोरांनी हातात कुदळ, फावडे घेऊन काम सुरू केले. हाताला फोड आली... लोक हसली... वेड्यात काढलं... पण लहान हातांनी जिद्दीने जे काम केलं ते गावातील मोठी माणस करू शकली नाही.....!या गावात जिव्हाळाच्या चमूने वर्धेवरून ५० कीलोमिटर दूरवर असलेल्या भिवापूर या गावात श्रमदानासाठी गेले. येथे गेल्यावर माहिती झाले की गावातील एक विशाल घाडगे नावाच्या तरुणाने गावातून चिमुकल्यांच्या मदतीने श्रमदान केले. येथे काम करणाऱ्या बालकांशी चर्चा केल्यावर माहिती झाले की हे सगळ ते कुणाच्या प्रशंसेसाठी किंवा बक्षीसासाठी करीत नसून निस्वार्थ भावनेने गावाच्या जलसमृद्धिसाठी करीत असल्याचे समोर आले. यामुळे त्यांच्या कामात आपलाही वाटा असावा असे म्हणत जिव्हाळा या सामाजिक टनेने आपला सहभाग नोंदविला.उद्याच्या भारताच भविष्य असणाऱ्या जबाबदार बालकांच्या या समाज व निसर्गपयोगी कार्याला प्रोत्साहन देवून त्यात आपला वाटा उचलन्यासाठी जिव्हाळा चमूने गावात जावून श्रमदान केले. त्यांनी भिवापूर येथे श्रमदानाच्या या उपक्रमासाठी अतुल पाळेकर, प्रशांत देशमुख, प्रशांत भोसले, किशोर वागदरकर, सुमित हिवसे, नीलेश सांगोले, तुषार पांडे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.पावसाच्या स्वागताची तयारीसेलु - पाणी फाऊंडेश अंतर्गत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेमध्ये सहभागी गायमुख गावाने पावसाच्या स्वागताची पूर्ण तयारी केली. स्पर्धा सुरु झाल्यापासून गावाने स्पधेर्ची कामे सुरु केली, स्पर्धे दरम्यान गावाने ४२ शोषखड्डे, करंज, शेवगा व इतर १५०० झाडांची रोपवाटिका, जल बचतीचे कामे, गावाला गावाचा वाटर बजेट सादर, आगपेटीमुक्त शिवार व माती परीक्षणाचे कामे केली. तर श्रमदानातून पावसाच्या पाण्याचे संकलन करण्याकरिता अनेक कामे केली आहेत. गावाने या कामामधून वार्षिक अंदाजे १ कोटी ७५ लाख 50 हजार लिटर पाणी जमिनीत साठवण्याची क्षमता या गावात श्रमदानातून निर्माण करण्यात आली आहे. या प्रकारे गावाने राज्यात एक वेगळ स्थान निर्माण केल आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी गावातील सर्व लोकांनी पावसाला परंपरेनुसार आमंत्रित करण्यासाठी नाविन्य पूर्ण उपक्रम म्हणून श्रमदानातून तयार केलेल्या वनतळ्यावर धोंडी काढून पावसाला निमंत्रण दिले. धोंडी सुरु असताना गाव धोंडीला साद घालत होते. ‘धोंडी धोंडी पाणी दे, धान कोंडा पिकू दे, धोंडी धोंडी पाणी दे, धान कोंडा पिकू दे’ म्हणत गावकºयांनी पावसाचे आवाहन केले.वॉटर कप स्पर्धेने खडका गाव केले एकसंघसेलू - तालुक्यातील खडका या गाव पाणीदार करण्याकरिता गावातील स्त्री, पुरूष, युवक, युवतींनी रामजी नागतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाला खोलीकरण, कंटूर बडींग, शेततळे, शोषखड्डे, रोपवाटीका ही कामे केली. २२ मे रोजी रात्री १२.३० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ सातव यांची उपस्थित होती. याप्रसंगी पाणी फाऊंडेशनचे समन्वयक अमित दळवी, सहाय्यक प्रवीण राठोड, रामुजी नागतोडे, पंचायत समिती सदस्य प्रणिता भुसारी, सरपंच विवेक भोयर, प्रदीप भुसारी उपस्थित होते. तसेच गावकरी तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सुधाकर मेहरे, प्रल्हाद गिरीपुंजे, गणपत मेटकर, भक्तराज अलोणे, निळकंठ राऊत, मोरेश्वर तेलरांधे उपस्थित होते. उपस्थितांचे आभार विवेक भोयर यांनी मानले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा