भाजपचे दोन गट समोरासमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST2019-08-31T06:00:00+5:302019-08-31T06:00:16+5:30
आजपर्यंत या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समितीचे माजी सभापती चंदू गोमासे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामराव काकडे या दोन गटात होत होती. या वेळी मात्र चंदू गोमासे यांचे पुत्र, माजी पं.स. सदस्य अमित गोमासे हे भाजपत असून यांच्या मातोश्री वैशाली चंदू गोमासे या सरपंच पदासाठी मैदानात आहे.

भाजपचे दोन गट समोरासमोर
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : आकोली येथील नऊ ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदासाठी ३१ ऑगस्टला ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. ही निवडणूक भाजपच्या दोन गटात होत असल्याने संपूर्ण तालुक्याचेच त्याकडे लक्ष लागले आहे. असे असले तरी मतमोजणीनंतरच कुणाच्या गळ्यात विजय माळ पडेल,हे स्पष्ट होणार आहे.
आजपर्यंत या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समितीचे माजी सभापती चंदू गोमासे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामराव काकडे या दोन गटात होत होती. या वेळी मात्र चंदू गोमासे यांचे पुत्र, माजी पं.स. सदस्य अमित गोमासे हे भाजपत असून यांच्या मातोश्री वैशाली चंदू गोमासे या सरपंच पदासाठी मैदानात आहे. तर यांचे विरोधात भाजपमध्ये असणारे नरेश मुरले यांचा गट आमने-सामने ठाकला असून यांच्याकडून सरपंच पदासाठी निशा दीपक गव्हाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवार भाजपा समर्थित गटाचे असल्याचे सांगितले जात असून मतदार कुणाला बहूमताचा कौल देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे नऊ सदस्यांपैकी गोमासे गटाचे तीन सदस्य अविरोध निवडून आले आहेत.