विजेच्या धक्क्याने दोन बालकांचा मृत्यू; वर्धा जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 16:25 IST2020-06-04T16:22:22+5:302020-06-04T16:25:32+5:30
विजेचा स्पर्श होऊन दोन बालकांचा वेगवेगळ्या ठिकाणी अंत झाल्याच्या दोन हृदयद्रावक घटना वर्धा जिल्ह्यात घडल्या.

विजेच्या धक्क्याने दोन बालकांचा मृत्यू; वर्धा जिल्ह्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: खेळताना विजेच्या तारेला धक्का लागल्याने विजेचा स्पर्श होऊन दोन बालकांचा वेगवेगळ्या ठिकाणी अंत झाल्याच्या दोन हृदयद्रावक घटना वर्धा जिल्ह्यात घडल्या.
बुधवारी पाऊस पडत असताना आकाश अमोल उईके (९) हा मुलगा समुद्रपूर तालुक्यात विठ्ठल रुखमाई मंदिरात खेळत होता. मंदिरात खेळत होती. खेळताना तेथील विजेच्या तारेला त्याचा धक्का लागला. तेथील खिडकीवरील तारांमध्ये सुरू असलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेत पाईकमारी येथे हर्षल भोयर हा सहा वर्षांचा मुलगा घरीच खेळत असताना त्याचा कूलरला स्पर्श होऊन विजेचा धक्का बसला.यात त्याचा मृत्यू झाला. पोलीस दोन्ही घटनांचा तपास करीत आहेत.