शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध व्यवसाय अडचणीत

By admin | Updated: May 31, 2014 23:41 IST

अतवृष्टीमुळे खरीप हंगाम गेला तर गारपिटीमुळे रब्बी हंगामही मातीमोल झाला. अशावेळी शेतीला पूरक असणार्‍या दुग्ध व्यवसायावर शेतकरी अवलंबून असायचा. दुग्ध व्यवसाय हा त्यांच्यासाठी जोडधंदा ठरला आहे.

वर्धा : अतवृष्टीमुळे खरीप हंगाम गेला तर गारपिटीमुळे रब्बी हंगामही मातीमोल झाला. अशावेळी शेतीला पूरक असणार्‍या दुग्ध व्यवसायावर शेतकरी अवलंबून असायचा. दुग्ध व्यवसाय हा त्यांच्यासाठी जोडधंदा ठरला आहे. शेतीला पूरक डेअरी व्यवसाय असला तरी बँकांची कर्ज प्रकरणे मंजुरीत असलेल्या उदासीनतेमुळे आता हा व्यवसायसुद्धा डबघाईस आला आहे.शेतकरी  आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना डेअरी क्षेत्रात जोडधंद्यातून आधार देण्यासाठी गाई, म्हशी, शेळ्या खरेदीकरिता जिल्हा ऋण योजनेतून यावर्षी कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. वर्ष संपले तरी एकाही राष्ट्रीकृत बँकेत कर्ज प्रकरणे मंजूर नसल्याचे समजते. ठरविल्याप्रमाणे कर्ज प्रकरणे वेळोवेळी मंजूर झाली असती तर जिल्ह्यातील  हजारो नागरिकांना दुधाळ जनावरे मिळून जोडधंदा करता आला असता कर्जाच्या खाईतून बाहेर निघून आत्मनिर्भर होण्याचा मार्ग गवसला असता. जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती आहे. यावरुन शासकीय योजनेचा लाभ जनतेला वेळीच मिळत नसल्याचे  दिसून  येते.  शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेत अपयश आले असताना लोकप्रतिनिधी काय करतात, हा प्रश्न भेडसावत आहे. नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. जिल्ह्यात कोटयवधी  रुपयांचे कर्ज गाय, म्हशी खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काहीच शाखांनी मोजक्याच केसेस बकर्‍या खरेदीसाठी  केल्या. पण ग्रामीण व राष्ट्रीकृत बँकांनी दोन्ही बाबतीत वर्षभर उदासीन धोरण राबविले आहे.  गरजुंना वर्षभर दुधाळ जनावरांसाठी कर्ज मिळाले नाही. शेतकर्‍यांना जोडधंद्यासाठी कर्जच उपलब्ध होत नसेल तर त्यानी जोडधंदा कसा करावा, हा प्रश्नच आहे. दुधाळ जनावरांसाठी जर शेतकर्‍यांना त्वरित कर्ज उपलब्ध करुन दिले तर त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो. सध्या दुधाचे दर  वाढतच आहे.(शहर प्रतिनिधी)