शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाची धडक; ट्रकचालकाचा स्टेअरींगमध्ये अडकून मृत्यू;  तीन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 16:16 IST

मिळालेल्या माहितीनुसार रविवार २३ मेरोजी रात्री १.२० दरम्यान आयशर क्रमांक एम. एच. ४९ ए.टी. ३३८५ चा चालक प्रदीप सरोदे, ( ३८) , रा.नागपूर हा पेदापल्ली वरून आंबा घेवून नागपूरला गेला व गाडी खाली करून पुन्हा आंबे भरण्याकरीता पेदापल्ली तेलंगना येथे जात होता.

समुद्रपूर (वर्धा) : नागपूर-चंद्रपूर मार्गावर जाम जवळ नागपूरहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रकची चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील अज्ञात वाहनाला जबर धडक बसली. या अपघातात ट्रक चालकाचा स्टेअरींगमध्ये अडकून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवार २३ मेरोजी रात्री १.२० दरम्यान आयशर क्रमांक एम. एच. ४९ ए.टी. ३३८५ चा चालक प्रदीप सरोदे, ( ३८) , रा.नागपूर हा पेदापल्ली वरून आंबा घेवून नागपूरला गेला व गाडी खाली करून पुन्हा आंबे भरण्याकरीता पेदापल्ली तेलंगना येथे जात होता. मात्र, गाडी चालवताना झोप आल्याने सरोदे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यांच्या गाडीची एका अज्ञात वाहनाला मागून धडक बसली. या अपघातात सरोदे स्टेअरींगमध्ये अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

यावेळी ट्रकमध्ये असलेले राहुल  सुधाकर ( ४८), गौतम शंकर नका ( २१) रा. दोन्ही पेदापल्ली (तेलंगना) व्दारका बेनीप्रसाद गौर ( ४८) रा. नागपुर हे जखमी झाले. अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिस चौकीला मिळताच साय्यक पोलिस निरीक्षक स्नेहल राऊत, पोलीस कर्मचारी नरेद्र दिघडे, नागेश तिवारी, बंडू डडमल, दिलीप वादीले, यांनी घटनास्थळी जाऊन आयशरमधील फसलेला चालकाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी समुद्रपूरला रवाना केला. तसेच जखमींनाही बाहेर काढून समुद्रपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर रोडवर अपघातग्रस्त वाहन रोडच्या बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. यासंदर्भात समुद्रपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातnagpurनागपूरTelanganaतेलंगणा