वृक्षसंगोपनाचा सर्व्हे खोटा, म्हणे ९६ टक्के झाडे जगली
By Admin | Updated: June 21, 2017 17:33 IST2017-06-21T17:33:39+5:302017-06-21T17:33:39+5:30
ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेत मागील काही वर्षांपासून शासन वृक्षारोपणावर भर देत आहे. मागील वर्षी दोन कोटी वृक्षलागवड

वृक्षसंगोपनाचा सर्व्हे खोटा, म्हणे ९६ टक्के झाडे जगली
ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 21 - ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेत मागील काही वर्षांपासून शासन वृक्षारोपणावर भर देत आहे. मागील वर्षी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात आला. यात शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पदाधिकारी यांना उद्दीष्ट देत वृक्षारोपण करण्यात आले. आज एक वर्षाने या रोपांचे सर्वेक्षण करण्यात आले; पण हा सर्व्हे केवळ फेक असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. प्रत्यक्षात नगण्य झाडे जिवंत असताना ९६ टक्के वृक्ष जगल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.