शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा मालवाहू वाहनातून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

निंबोली गावातील ग्रामस्थांची सर्व उपजीविका शेतीवर असल्याने जवळपास ३५० घरे अद्याप जुन्या ठिकाणी आहे. त्याच ठिकाणी त्यांची कुटुंबेही आहेत. नवीन पुनर्वसित ठिकाणी केवळ १२ ते १३ घरे नागरिकांनी बांधलेली आहेत. जुन्या ठिकाणी म्हणजे जुन्या निंबोली गावातच सर्व ग्रामस्थ वास्तव्याला असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. परिसर वर्धा प्रकल्पात गेल्याने गावात मूलभूत सुविधा नाहीत. रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे.

ठळक मुद्देजीविताला धोका : एसटीची बसफेरीच नाही!

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यातील निंबोली गावात अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जात नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क मालवाहू चारचाकी वाहनातून उभ्याने प्रवास करून शैक्षणिकस्थळी जावे लागत असल्याचे चित्र आहे. यात शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असून जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.निंबोली गावातील ग्रामस्थांची सर्व उपजीविका शेतीवर असल्याने जवळपास ३५० घरे अद्याप जुन्या ठिकाणी आहे. त्याच ठिकाणी त्यांची कुटुंबेही आहेत. नवीन पुनर्वसित ठिकाणी केवळ १२ ते १३ घरे नागरिकांनी बांधलेली आहेत. जुन्या ठिकाणी म्हणजे जुन्या निंबोली गावातच सर्व ग्रामस्थ वास्तव्याला असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. परिसर वर्धा प्रकल्पात गेल्याने गावात मूलभूत सुविधा नाहीत. रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. यामुळे ग्रामस्थांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. या गावातून ३० ते ३५ विद्यार्थी पाचवी ते दहावीचे शिक्षण घेण्यासाठी जातात, तर अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी २५ ते ३० विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी जातात. मात्र, गावात बसच येत नसल्याने मालवाहू वाहनातून नाईलाजाने जनावरासारखे उभ्यानेच शिक्षणासाठी जावे लागत आहे.६० टक्के शेती संपादिततालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील संपूर्ण घरे निम्न वर्धा प्रकल्पाने गिळंकृत केली. या गावकऱ्यांची ५० ते ६० टक्के शेतीही या धरणाकरिता संपादित करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांचे आर्वी देऊरवाडा या मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतनच्या बाजूला पुनर्वसन करण्यात आले.वाहतुकीसाठी रस्ता व्यवस्थित नाही, हे खरे. मात्र, लहान वाहने मालवाहू गावात येतात. एसटी ला पावसाळ्यात रस्त्याची अडचण होते, हे ठिक आहे पण आता हिवाळा उन्हाळा असल्याने बसेस गावात न येण्यास काय अडचण आहे? नाईलाजाने जीव धोक्यात घालून मालवाहू गाडीतून जावे लागते. बसफेरी सुरू करण्यासाठी निवेदन ही दिले; मात्र केराी टोपली दाखविण्यात आली.- सुयोग शेंडे, (निंबोली) विद्यार्थी, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, आर्वी.सध्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे दिवस आहे दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. पुढच्याच महिन्यात पाचवी ते नववीपर्यंतच्या वार्षिक परीक्षा आहे. मात्र, अनेक महिन्यापासून बस गावात येत नसल्याने आम्हाला वेळेवर शाळेत जाता येत नाही. परिणामी मोठा त्रास होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा असून बस सुरू करण्याची रास्त मागणी आहे.- साक्षी संतोष हांडे (निंबोली), विद्यार्थीनी, मॉडेल हायस्कूल देऊरवाडा

टॅग्स :Studentविद्यार्थी