वाहतूक पोलिसांचा अजब कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:48 IST2019-06-18T23:47:59+5:302019-06-18T23:48:43+5:30
बजाज चौकातून शिवाजी चौकाकडे येताना डावा वळणमार्ग भामटीपुराकडे जाणाऱ्या मार्गावर तनुश्री लॉजच्या बाजूला वाहतूक पोलीस विभागाकडून एकेरी मार्गावरून येणाºया वाहनांना मनाई असा फलक लावलेला आहे. मात्र सूचना एकाच बाजूने लिहिलेली असल्याने वाहनचालकांच्या दृष्टीस पडत नाही.

वाहतूक पोलिसांचा अजब कारभार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बजाज चौकातून शिवाजी चौकाकडे येताना डावा वळणमार्ग भामटीपुराकडे जाणाऱ्या मार्गावर तनुश्री लॉजच्या बाजूला वाहतूक पोलीस विभागाकडून एकेरी मार्गावरून येणाºया वाहनांना मनाई असा फलक लावलेला आहे. मात्र सूचना एकाच बाजूने लिहिलेली असल्याने वाहनचालकांच्या दृष्टीस पडत नाही. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. हा प्रकार थांबवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पट्टेवार यांनी केली आहे.
वाहनांना दिसेल अशी सूचना फलकावर नसल्यामुळे अनेक वाहनचालक बिनधास्त येतात. ती सूचना इकडून तिकडे जाताना दृष्टीस पडते. रामनगरकडून येणारी वाहने भामटीपुरा मार्गावरून येतात. वाहतूक पोलीस येणाºया वाहनचालकांना वनवेच्या नावावर दंड आकारतात. वास्तविक येणाºया वाहनांना फलकावर वनवे किंवा वाहतुकीस मनाई असे दर्शविलेले नाही. यात दंड आकारून पोलीस खिसा गरम करीत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.
त्या फलकावरील सूचना योग्य दिशेने नमूद करण्यात यावी व येणाºया वाहनचालकांची विनाकारण होत असलेली लूट थांबवावी, अशी मागणीही शिवा संघटनेचे, भाजप वर्धा शहर कार्यालय मंत्री सुरेश पट्टेवार यांनी वाहतूक नियंत्रक शाखेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.