शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूल पूर्ण होण्यापूर्वीच टोलवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST

वर्धा-बुटीबोरी या मार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले असले तरी सेलडोह परिसरातील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीकरिता खुला करण्यात आलेला नाही. असे असतानाही वर्धा-नागपूर मार्गावरील हळदगाव येथे टोल नाका उभारून वाहनचालकांकडून टोलच्या नावाखाली पैसे उकळले जात आहेत.

ठळक मुद्देहळदगाव टोल नाक्यावर मनमर्जी, एकल प्रवासाची पावती

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : वर्धा-बुटीबोरी या मार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले असले तरी सेलडोह परिसरातील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीकरिता खुला करण्यात आलेला नाही. असे असतानाही वर्धा-नागपूर मार्गावरील हळदगाव येथे टोल नाका उभारून वाहनचालकांकडून टोलच्या नावाखाली पैसे उकळले जात आहेत. रस्त्याचे संपूर्ण काम झाल्यावरच टोल घ्यावा, अशी वाहनचालकांची मागणी आहे.बुटीबोरी-वर्धा या मार्गाची झालेली दैनावस्था पाहून या मार्गाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले. दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या माध्यमातून या मार्गाचे रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम काही अपवाद वगळता युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. सद्यस्थितीत सेलडोह परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. परंतु, तेथून काही अंतरावर असलेल्या हळदगाव येथे टोल नाका उभारून मनमर्जीने टोलवसुली केली जात आहे. या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांना एकेरी प्रवासाची पावती दिली जात आहे. केवळ एकेरी प्रवासाची पावती का देता अप-डाऊनची द्या, अशी विचारणा वाहनचालकांकडून केली असता एनएचआयने बंदी घातली असल्याचे कारण टोल नाक्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांकडून पुढे केले जात आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या अडचणीत भर पडली आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.व्यवस्थापकाचा भ्रमणध्वनी देण्यास नाया प्रकरणी हळदगाव येथील टोल नाका प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी टोलवर कार्यरत कर्मचाºयांना टोलच्या व्यवस्थापकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची विचारणा केली असता क्रमांक देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे टोलनाका प्रशासनाची बाजू जाणून घेता आली नाही.

टॅग्स :Socialसामाजिक