विकासाचा झंझावात; कृषी कार्यालयाची इमारत दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 10:34 PM2019-08-07T22:34:04+5:302019-08-07T22:34:31+5:30

कृषी क्षेत्राला चालना मिळावी, शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे यासाठी तालुकास्तरावर कृषी विभागाचे कार्यालय आहे. पण, विकासात एक पाऊल पुढे असलेल्या शासनाने तालुक्यात विकासाचा झंझावात सुरू ठेवला असला तरी येथील तालुका कृषी विभागाच्या इमारतीच्या दुर्दशेकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

In the throes of development; Agricultural office building neglected | विकासाचा झंझावात; कृषी कार्यालयाची इमारत दुर्लक्षित

विकासाचा झंझावात; कृषी कार्यालयाची इमारत दुर्लक्षित

Next
ठळक मुद्देशासन-प्रशासनाचे दुर्लक्ष : अधिकारी, कर्मचाऱ्यांची वसाहतही आली मोडकळीस

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : कृषी क्षेत्राला चालना मिळावी, शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे यासाठी तालुकास्तरावर कृषी विभागाचे कार्यालय आहे. पण, विकासात एक पाऊल पुढे असलेल्या शासनाने तालुक्यात विकासाचा झंझावात सुरू ठेवला असला तरी येथील तालुका कृषी विभागाच्या इमारतीच्या दुर्दशेकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
वर्धा-नागपूर महामार्गालगत कोट्यवधी रुपयांची असलेली शेतजमीन तालुका कृषी अन्वेषण व तालुका मध्यवर्ती फळरोप वाटिकेसाठी कृषी विभागांतर्गत आहे. येथे तत्पूर्वी बांधण्यात आलेल्या गोदामासह काही वर्षांपासून असलेल्या जीर्ण इमारती शासनापासून दुर्लक्षित असल्याचे साक्ष देत आहेत.
१५ वर्षांपूर्वी होणारे कृषी मेळावे, मार्गदर्शन शिबिर सद्यस्थितीत होत नसल्याने शेतकरीही कामानिमित्त या कार्यालयाकडे फिरकत आहे. सेलू तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सेलू मंडळ अधिकारी, मध्यवर्ती फळ रोपवाटिका व कृषी अन्वेषण विभागाचे कार्यालय येथे आहे. या कार्यालयाला एकेकाळी कृषीवैभव प्राप्त झाले होते.
तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह नव्हते, तेव्हा याच कृषी विभागात सुसज्ज असे विश्रामगृह होते. याच विश्रामगृहातून काही काळ तालुका कृषी अधिकारी कार्यालय चालविण्यात आले. आज ती इमारत मोडकळीस आली आहे.
कर्मचारी वसाहतीला गळती लागली असून कर्मचाºयांसह कुटुंबीयाच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मंडळ अधिकारी कार्यालयाचे कामकाज नव्याने बांधण्यात आलेल्या गोदामाच्या इमारतीतून चालत आहे. कृषी अन्वेषण व मध्यवर्ती फळ रोपवाटिकेचे कार्यालय पाहिल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्याची वेळ येत आहे.
तालुक्यात या पाच वर्षांत विविध विकासकामांवर आलेले कोट्यवधी रूपये पाहता तालुक्यात पांदण रस्ते, प्रवासी निवारे, पर्यटनाला चालना देणाऱ्या विकासकामांचा झंझावात सुरू असताना हरितक्रांतीचे स्वप्न दाखविणाऱ्या कृषी विभागाला सुसज्ज इमारत नसावी, हे तालुकावासीयांचे दुर्भाग्य म्हणावे काय? असा प्रश्न तालुक्यातील शेतकºयांना पडला आहे. शासनाने सेलू तालुक्यातील कृषी विभागाच्या इमारतीकडे लक्ष देत जीर्णोद्वार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

इमारत जीर्ण, खुल्या जागेवर गवताचे पीक
विस्तीर्ण अशा जागेत असलेले जीर्ण इमारतीतील कार्यालय व सभोवताल वाढलेले गवत पाहता येथे कर्मचारी करीत असलेली कामे ही वास्तविकता आहे. रात्रीच्यावेळी या कार्यालयात फळ रोपवाटिका व कृषी अन्विक्षा विभागाचे अधिकारीच वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. या कार्यालयापर्यंत जाणारा रस्ताही पावसाळ्याच्या दिवसात चिखलमय असतो. कोट्यवधी रुपयांच्या या जागेची कुंपणाअभावी सुरक्षा वाºयावर आहे.

केवळ फलकच राहिला
कृषी चिकित्सालय, अन्विक्षा प्रात्यक्षिक प्रक्षेत्र व जिल्हा प्रशिक्षण केंद्र तालुकास्थळी होते. येथे शेतकºयांना शेतीविषयक व चांगले उत्पन्न घेण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे होत होती. पण इमारतच नसल्याने हे सर्व उपक्रम बंद झाले आहेत. आता केवळ या नावाचा फलक उरला असून त्या फलकाचा रंगही उडाला आहे. तर येथे असणारे मृदसंधारण कार्यालयही दिसेनाशे झाले आहे.

Web Title: In the throes of development; Agricultural office building neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती