वर्धा-नागपूर महामार्गावर तीन वाहनांची धडक; एक ठार, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 13:57 IST2019-02-18T13:56:40+5:302019-02-18T13:57:17+5:30
नागपूर-वर्धा महामार्गावर असलेल्या मामा-भांजा दर्ग्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रक्स व एका ट्रेलरची आपसात धडक होऊन तीत ट्रक ड्रायव्हर जागीच ठार तर दोघेजण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १२ च्या सुमारास घडली.

वर्धा-नागपूर महामार्गावर तीन वाहनांची धडक; एक ठार, दोघे जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर-वर्धा महामार्गावर असलेल्या मामा-भांजा दर्ग्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रक्स व एका ट्रेलरची आपसात धडक होऊन तीत ट्रक ड्रायव्हर जागीच ठार तर दोघेजण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १२ च्या सुमारास घडली.
वर्ध्याहून नागपूरकडे येत असलेल्या ट्रकने समोर जात असलेल्या ट्रेलरला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रकसोबत त्याची धडक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की तीत दोन्ही ट्रक्सच्या केबिन्सचा चुराडा झाला व बाजूने जात असलेल्या ट्रेलरलाही अपघातग्रस्त केले. या अपघातात ट्रकचालक गोपाल गुप्ता, (४५) रा. नालासोपारा, मुंबई हा जागीच ठार झाला तर दुसरा ट्रक ड्रायव्हर अकरम शेख, रा. मुर्शीदाबाद हा जखमी झाला आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.