तीन मजली इमारत भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:22 IST2018-03-31T23:22:34+5:302018-03-31T23:22:34+5:30
पुलगाव-नाचणगाव रस्त्यावरील शिवगिरी नगर येथील संतोष बजाज यांच्या मालकीची सियाराम टाईल्स (ग्रेनाईट) ही तीन मजली इमारत क्षणात भुईसपाट झाली.

तीन मजली इमारत भुईसपाट
लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : पुलगाव-नाचणगाव रस्त्यावरील शिवगिरी नगर येथील संतोष बजाज यांच्या मालकीची सियाराम टाईल्स (ग्रेनाईट) ही तीन मजली इमारत क्षणात भुईसपाट झाली. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. यावेळी इमारतीत कुणी नसल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र यात त्यांचे चांगलेच नुकसान झाले.
ही इमारत कोसळण्यामागे कारण काय, ते मात्र कुणालाही कळू शकले नाही. क्षणात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही इमारत भुईसपाट झाली. इमारत कोसळताच येथे बघ्यांची गर्दी झाली. पोलिसांचा ताफाही दाखल झाला. त्यामुळे जमाव नियंत्रित करणे शक्य झाले. इमारत कशामुळे पडली याचा अद्याप उलगडा झाला नाही. या इमारतीच्या स्थिती याबाबतच्या चर्चेला सध्या गावात उधान आले आहे. या इमारतीमुळे आसपासच्या नागरिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
शेजाऱ्याची कारही दबली
भुईसपाट झालेल्या या इमारतीच्या शेजारी राहत असलेल्या मनीष देशमुख यांच्या घराची संरक्षक भिंत इतारमीच्या मलब्याखाली आली. शिवाय त्यांची नवी कारही यात दबल्या गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. शिवाय यात त्यांची एक दुचाकीही दबल्या गेली.