शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अडकलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

वर्धा जिल्ह्यातील किती नागरिक इतर राज्यात व जिल्ह्यात अडकले आहेत, तसेच वर्धा जिल्ह्यात इतर जिल्हे व राज्यातील किती नागरिक अडकले आहेत याची माहिती संकलित करण्याचे युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी नागरिकांनी त्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात फोनद्वारे संपर्क करून द्यावी. अर्जात संपूर्ण नाव, पत्ता, अडकलेल्या ठिकाणाचा पत्ता, संपर्क क्रमांक आदी महत्त्वाची माहिती नमूद करावी.

ठळक मुद्देलॉकडाऊन इफेक्ट : जिल्हाधिकारी भिमनवार यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनमुळे देशात सर्वच प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद केल्यामुळे जिल्ह्यातील नागरिक बाहेर राज्यासह इतर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. इतर राज्यात व जिल्ह्यात अडकून पडलेल्या वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी तेथील जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी. तसेच वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या इतर राज्यातील व जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे.कोरोना संसर्गासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने देशात लॉकडाऊन केले. सर्व प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद केली. त्यामुळे अनेक नागरिक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले. तसेच आपल्या जिल्ह्यातही इतर राज्यातील व जिल्ह्यातील कामगार, विद्यार्थी, पर्यटक अडकून पडले आहेत. प्रत्येक जिल्हा प्रशासन त्यांच्या जिल्ह्यात अडकलेल्या आणि परत त्यांच्या स्वगावी जाण्यास इच्छूक नागरिकांची यादी तयार केल्या जात आहे.वर्धा जिल्ह्यातील किती नागरिक इतर राज्यात व जिल्ह्यात अडकले आहेत, तसेच वर्धा जिल्ह्यात इतर जिल्हे व राज्यातील किती नागरिक अडकले आहेत याची माहिती संकलित करण्याचे युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी नागरिकांनी त्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात फोनद्वारे संपर्क करून द्यावी. अर्जात संपूर्ण नाव, पत्ता, अडकलेल्या ठिकाणाचा पत्ता, संपर्क क्रमांक आदी महत्त्वाची माहिती नमूद करावी. तसेच ज्या जिल्ह्यातून प्रवास करावयाचा आहे, त्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडे प्रवासाच्या परवानगीसाठी अर्ज करावा. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करताना करावयाच्या प्रक्रियेबाबत त्यांना सविस्तर माहिती संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येईल. वर्ध्यातून बाहेर जाणाऱ्या नागरिकांसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार तर बाहेरून वर्ध्यात येणाऱ्या नागरिकांसाठी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या सर्व कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना त्यांची माहिती प्रशासनाला कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे. मागील महिनाभरापासून अनेक नागरिक जिल्ह्याबाहेर अडकून पडले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत आहे.प्रवास तिकिटांसाठी पैसेच नाहीलॉकडाऊनमुळे कुणी निवारगृहात तर कुणी आहे त्याच झोपडीत अडकून राहिले आहे. महिनाभरापासून हाताला काम नाही. अनेकांकडे होते तेवढे पैसे संपले आहे. अशा स्थितीत प्रशासनाकडून अडकलेल्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी धडपड सुरू केली आहे. गावी जाणाऱ्यांना परतीच्या प्रवासाचा खर्च करावा लागणार आहे. मग, तिकीटांसाठीचा हा खर्च कुठून करणार, असा प्रश्न अडकलेल्या कामगारांना पडला आहे. जवळ असलेले पैसे अनेकांनी आॅनलाईन पाठविले. अनेकांचे पैसे गाव गाठताना वाटेतच खर्च झाल्याने खिसे रिकामे झाले आहेत. तिकिटाएवढेही पैसे कामगारांकडे असतील याबाबत साशंकताच आहे. त्यामुळे शासनाने याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या