शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मुलांचे होणार पुन्हा शवविच्छेदन

By admin | Updated: May 2, 2015 00:09 IST

तालुक्यातील धावसा(हेटी) येथील मोरेश्वर वझरकर (१२) व शैलेश करणाके (१४) या दोघांच्या मृत्यू प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

संशय: पाण्यात बुडून नाही तर विजेच्या धक्क्याने मृत्यूकारंजा (घाडगे): तालुक्यातील धावसा(हेटी) येथील मोरेश्वर वझरकर (१२) व शैलेश करणाके (१४) या दोघांच्या मृत्यू प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून नाही तर त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून या दोघांचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश आर्वीचे उपविभागीय अधिकारी एम.आर.चव्हाण यांनी दिले. शिवाय जिल्हा शल्य चिकित्सकांनी घटनास्थळावर जात शवविच्छेदन करावे असे आदेशात नमूद आहे. सोबतच कारंजाचे नायब तहसीलदार व पोलीस निरिक्षकांनी प्रेत पुरलेल्या जागी जात पंचनामा करण्याचे आदेशात म्हटले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोरेश्वर व शैलेश या दोघांचा मृतदेह २४ मार्च २०१५ रोजी गावालगतच्या पाझर तलावात आढळून आला. दोघांचा मृत्यू पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मृतकांच्या पालकांनी त्यावेळी कोणताही संशय दर्शविलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर शवविच्छेदन करून पालकांनी अंत्यसंस्कार केले. मात्र त्याचा मृतदेह मिळण्यापूर्वी पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार नोंदविलेल्या बयानानुसार मृतकांचे वडील व नातेवाईकांचे म्हणने नोंदविण्यात आले. यात मुलांच्या मृत्यूबाबत संशय दर्शविलेला आहे. त्यांच्या बयानानुसार दोन्ही मुले विद्युत करंटने मरण पावल्याची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. तसा अर्ज मृतकाच्या वडिलांनी कारंजा पोलिसात दिला आहे. या अर्जानुसार ३ मार्च २०१५ रोजी धावसा (हेटी) येथील कृष्णा बरखडे यांच्या शेतातील धुऱ्यावर असलेल्या तारांत विद्युत प्रवाह असून त्यांच्या स्पर्शाने या दोघांचा मृत्यू झाला. पुरवा नष्ट करण्याकरिता दोघांचे प्रेत तलावात टाकल्याचे म्हणने आहे; मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवालात दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. यात संशय व्यक्त होत असल्याने दोन्ही मुलांचे पुन्हा शवविच्छेदन करून गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर काय ते सत्य समोर येईल. याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (शहर प्रतिनिधी)