शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
4
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
5
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
6
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
7
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
8
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
9
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
10
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
11
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
12
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
13
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
14
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
15
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
16
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
17
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
18
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
19
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
20
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांतून शोधावा लागतो इतवारा मार्ग

By admin | Updated: April 17, 2016 02:00 IST

सेवाग्राम रेल्वे स्थानकाकडून इतवारा मार्केटमधून वर्धा शहराकडे येत असलेल्या मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली आहे.

सेवाग्राम रेल्वे स्थानकापासूनच खड्डे : बसस्थानकाकडे जाणारा जवळचा रस्ता असूनही उपेक्षित
वर्धा : सेवाग्राम रेल्वे स्थानकाकडून इतवारा मार्केटमधून वर्धा शहराकडे येत असलेल्या मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली आहे. गिट्टी पूर्णपणे उखडून बाहेर आली आहे. परिणामी काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे सध्या इतवारा मार्ग हा अपघाताला स्वस्त झाल्याचे प्रवाश्यांमधून बोलल्या जात आहे.
सेवाग्राम रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांची नेहमीच वर्दळ असते. नियमित अपडाऊन करीत असलेल्या प्रवाश्यांचे वेळापत्रक हे रेल्वेवर अवलंबून असते. यामध्ये अनेक प्रवासी हे वर्धा बसस्थानकावर उतरून तात्काळ सेवाग्राम रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी निघतात. यासाठी त्यांना आॅटोने इतवारा मार्ग सोयीचा पडतो. त्याचप्रकारे रेल्वेने सेवाग्राम स्थानकावर आलेल्या नागरिकांना तात्काळ वर्धा बसस्थानकावर जायचे असल्यासही हाच मार्ग जवळचा असतो. अशा प्रवाश्यांची संख्या ही जास्त असल्याने या मार्गावर आॅटो आणि दुचाकीचालकांची नेहमीच वर्दळ असते. पण या डांबरी रस्त्याची सध्यस्थितीत अत्यंत दैना झाली आहे. ठिकठिकाणी रस्ता उखडून मोठमोठे खड्डे पडले आहे. गिट्टी रस्त्याच्या बाहेर जमा होत चालली आहे. परिणामी अपघाताची शक्यता या मार्गावर वाढत आहे.
किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहे. त्यामुळे या महत्वाच्या रस्त्याची पक्की दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने रस्ता आणखी खराब होणार आहे. अश्यावेळी वाहनानेच काय तर पायी चालणेही कठीण होऊन बसणार आहे. वाहनामुळे गिट्टी उडून ती मागच्या वाहनचालकांना लागत असल्याचे प्रकारही येथे नेहमीच घडत असतात.(शहर प्रतिनिधी)

रस्त्यावरील गिट्टी उखडल्याने वाहने होतात अनियंत्रित
रस्त्यावरील गिट्टी उघडी पडल्याने वाहने अनियंत्रित होऊन होणारे अपघात आता नित्याचेच झाले आहे. त्यातच समोरच्या वाहनाद्वारे गिट्टी उडून ती मागाहून येत असलेल्या वाहनावर उडून वाहनचालक जखमी झाल्याच्या घटना येथे नित्याच्याच झाल्या आहे. त्यामुळे खड्डे चुकवून वाट काढणे वाहनचालकांना जिकरीचे जाते. त्यातच आॅटोचालक भरधाव वाहने चालवित असतात. त्यामुळे आॅटोत बसलेल्या प्रवाश्यांनाही स्टेशन आणि बसस्थानकावर पोहोचेपर्यंत हादरे सहन करावे लागतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रवास नकोसा होतो.