शिक्षिकेच्या घरी धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 22:15 IST2019-08-13T22:14:34+5:302019-08-13T22:15:14+5:30

शहरातील नांदगाव चौक भागातील सयाजीनगर येथील शिल्पी बॅनर्जी यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. शिल्पी बॅनर्जी भवंस शाळेतील शिक्षिका आहे, हे विशेष.

Theft at the teacher's home | शिक्षिकेच्या घरी धाडसी चोरी

शिक्षिकेच्या घरी धाडसी चोरी

ठळक मुद्देसयाजीनगर परिसरात दहशत : हिंगणघाट पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहरातील नांदगाव चौक भागातील सयाजीनगर येथील शिल्पी बॅनर्जी यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. शिल्पी बॅनर्जी भवंस शाळेतील शिक्षिका आहे, हे विशेष.
एका पाठोपाठ एक अशा पाच चोऱ्यांमुळे पूर्वीच शहरात दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणांतील आरोपींना हूडकुन काढण्यात यश येताच आता शिल्पी बॅनर्जी यांच्या घरी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सयाजीनगर परिसरातील नागरिकांसह शहरात चोरट्यांबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, शिल्पी बॅनर्जी या कुटुंबीयांसह बुटीबोरी येथे गेल्या होत्या. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराला टार्गेट करून घरातून मुद्देमाल चोरून नेल्याचे सांगण्यात येते. तर चोरट्यांच्या हाती पाहिजे तसा मुद्देमाल लागला नसल्याचीही घटनास्थळी चर्चा होती. चोरट्यांनी घरातील मौल्यवान साहित्य व रोख हुडकून काढताना साहित्य अस्ताव्यस्त केल्याचे बॅनर्जी यांच्या निदर्शनास आले. बॅनर्जी यांच्या घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी फ्रीजमधील दूध सेवन केले. शिवाय बॅनर्जी यांच्या मृत वडिलांच्या फोटो समोर ग्लासभर दूधही ठेवले होते. इतक्यावरच चोरटे थांबले नाही तर त्यांनी घरातील डब्बे हुडकून एका डब्यातील बिस्कीट सफाचट केले. या घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Theft at the teacher's home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.