Wardha | सत्याग्रही घाटात अपघात; ट्रेलरचा ‘ब्रेक फेल’ अन् चालक जागीच ठार
By चैतन्य जोशी | Updated: September 24, 2022 17:45 IST2022-09-24T17:33:01+5:302022-09-24T17:45:01+5:30
ट्रेलरचे केबिन चक्काचूर

Wardha | सत्याग्रही घाटात अपघात; ट्रेलरचा ‘ब्रेक फेल’ अन् चालक जागीच ठार
वर्धा : लोखंडी प्लेट घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचा अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे अनियंत्रित ट्रेलरचा अपघात झाला. अपघातात केबिनचा चुराडा झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात २४ रोजी दुपारी १२ सुमारास सत्याग्रही घाटात झाला.
राजेश कुमार रा.बिहार असे मृतक चालकाचे नाव आहे. तर क्लिनर आनंद अभिराम कुमार (१९) रा. तिकोलिया, बिहार हा जखमी झाल्याची माहिती आहे. राजेशकुमार आणि आनंद कुमार हे दोघे नागपूरवरुन सी.जी. १२ एल. १३८२ क्रमांकाच्या ट्रेलरमधून अमरावतीकडे लोखंडी प्लेटा घेऊन जात होते. दरम्यान ट्रेलर सत्याग्रही घाटात पोहचताच अचानक ट्रेलरचे ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रेलर बाहुबली मंदिराजवळ पलटली होवून रस्त्याकडेला जऊन धडकला. अपघातात ट्रेलरचे केबिन चक्काचूर झाल्याने चालक राजेश कुमारचा दबून मृत्यू झाला. तर आनंद कुमार हा जखमी आहे.
मृतदेह ट्रेलर मध्येच फसल्याने पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने मृतदेह ट्रेलरबाहेर काढला. अपघातस्थळाचा पंचनामा करुन मृतदेह आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठविला.