शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

वीजपुरवठा खंडित करून मध्यरात्री व्यावसायिकांची दुकाने केली जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2022 05:00 IST

सारवाडी गावातील बसस्थानकालगत नागपूर-अमरावती महामार्गावर दुकाने आहेत. मागील ४० वर्षांपासून ही दुकाने लावण्यात येत असून दुकानांवरच त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र, गावातीलच पाच ते सहा गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने कोणतीही पूर्वसूचना न देता संपूर्ण सहाही दुकाने जमीनदोस्त केली. यामुळे व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सर्व आराेपींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांनी निवेदनातून करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील ४० वर्षांपासून काही व्यावसायिकांनी सारवाडी गावातील बसस्थानकालगतच्या गावठाणच्या जागेवर स्वखर्चाने छोटी-मोठी दुकाने थाटून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, १९ जून रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास पाच ते सहा जणांनी संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित करून जेसीबीच्या सहाय्याने व्यावसायिकांची सहाही दुकाने जमीनदोस्त केली. यामुळे मात्र, व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून पाचही आरोपींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, तळेगावचे पोलीस निरीक्षकांना निवेदनातून केली आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रमोद अजाब सरोदे रा. पारडी, नंदकिशोर ज्ञानेश्वर सिरस्कार, रा. किन्हाळा, गजानन रामराव मिरासे रा. सारवाडी, शेख शब्बीर शेख शहादुल्ला रा. तळेगाव यांची सारवाडी गावातील बसस्थानकालगत नागपूर-अमरावती महामार्गावर दुकाने आहेत. मागील ४० वर्षांपासून ही दुकाने लावण्यात येत असून दुकानांवरच त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र, गावातीलच पाच ते सहा गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने कोणतीही पूर्वसूचना न देता संपूर्ण सहाही दुकाने जमीनदोस्त केली. यामुळे व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सर्व आराेपींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांनी निवेदनातून करण्यात आली आहे.

पोलिसांना दिली होती मागीलवर्षीच पूर्वसूचना - आरोपींनी गावठाणची जागा रिकामी करण्यासाठी सर्व व्यावसायिकांना धमकीही दिली होती. व्यावसायिकांनी १९ ऑगस्ट २०२१ रोजी याबाबत तक्रार दाखल केली होती. तेव्हा पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली होती. मात्र, १९ जून २०२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सहा दुकाने जमीनदोस्त करण्यात आल्याने व्यावसायिकांनी तक्रार दिली असता पोलिसांनी एफआयआर दाखल केला. जर तेव्हाच पोलिसांनी दखल घेतली असती तर आज ही परिस्थिती व्यावसायिकांवर ओढावली नसती हे मात्र तितकेच खरे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे.

साहित्यांसह रोख रक्कमही नेली चोरून - व्यावसायिकांनी दुकानात जात पाहणी केली असता अनेक साहित्य तसेच पैसे दिसून आले नाही. प्रमोद सरोदे यांच्या दुकानातील सिलिंडर, बेंच, टेबल रोख चोरुन नेली. नंदकिशोर सिरस्कार यांच्या दुकानातील रक्कम व सलूनच्या उपयोगातील वस्तू चोरल्या. गजानन मिरासे यांच्या दुकानातील साहित्य, शेख शब्बीर यांच्या गादी दुकानातून कापड, कापूस, रुई चोरली.

जेसीबीसह वाहने पोलिसांनी जप्त करावी  - मध्यरात्रीच्या सुमारास कोणतीही पूर्वसूचना न देता काही भाडोत्री गुंडांनी व्यावसायिकांची दुकाने जमीनदोस्त करून साहित्य चोरून नेल्याने, गुन्ह्यात वापरलेले जेसीबी तसेच इतर वाहने जप्त करून आरोपींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

 

टॅग्स :businessव्यवसायPoliceपोलिस