सुनेला घ्यायला जाणाऱ्या सासूवर काळाची झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST2022-06-08T05:00:00+5:302022-06-08T05:00:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : माहेरी गेलेल्या सुनेला आणण्यासाठी कारने जात असलेल्या सासूवर काळाने झडप घातली. भरधाव कार अनियंत्रित ...

the mother-in-law death who is going to take the daughter-in-law | सुनेला घ्यायला जाणाऱ्या सासूवर काळाची झडप

सुनेला घ्यायला जाणाऱ्या सासूवर काळाची झडप

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : माहेरी गेलेल्या सुनेला आणण्यासाठी कारने जात असलेल्या सासूवर काळाने झडप घातली. भरधाव कार अनियंत्रित होत उलटल्याने सासरे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वडनेर-सिरसगाव मार्गावर येरणगाव शिवारात झाला.
सुवर्णा काशेट्टीवार (६५) असे मृत सासूचे तर रमेश काशेट्टीवार असे गंभीर जखमी सासऱ्याचे आणि राहूल आडे असे कार चालकाचे नाव आहे. हिंगणघाट येथील रिठे काॅलनी भागातील रहिवासी रमेश काशेट्टीवार व सुवर्णा काशेट्टीवार हे वृद्ध दाम्पत्य सून प्रज्ञा ही तिचे माहेर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे असल्याने तिला आणण्यासाठी एम. एच. ०२ बी. जी. ६०७८ क्रमांकाच्या कारने पुसदच्या दिशेने जात होते. भरधाव कार वडनेर येथून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या येरणगाव शिवारातील वळणावर आली असता कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहन रस्त्याच्या कडेला जात उलटले. यात कारमधील सुवर्णा काशेट्टीवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश हे गंभीर जखमी झालेत. शिवाय कार चालक राहुल आडे रा. हिंगणघाट यालाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. घटनेची नोंद वडनेर पोलिसांनी घेतली आहे.

 

Web Title: the mother-in-law death who is going to take the daughter-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.