शहरं
Join us  
Trending Stories
1
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
3
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
4
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
5
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
6
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
7
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
8
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
9
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
10
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
11
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
12
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
13
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
14
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
15
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
16
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
17
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
18
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
19
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
20
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात डोळ्यांच्या साथीने घातले थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

डोळ्यांतील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो. त्याला ‘कॉन्जुक्टिव्ह’ म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग होऊ डोळे चोळावेसे वाटतात. त्यालाच ‘डोळे आले’ असे म्हणतात. मागील आठवडाभरापासून शहरात या आजाराने थैमान घातल्याने खासगी आणि शासकीय रुग्णांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी होत आहे.

ठळक मुद्देअस्वच्छता, बदलत्या वातावरणाचा परिणाम। रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील आठवडाभरापासून शहरात डोळ्यांच्या साथीने थैमान घातले आहे. परिणामी, शासकीय आणि खासगी रुग्णालयात संसर्गजन्य या आजाराच्या रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे.अनेक भागात या आजाराने थैमान घातले आहे. शहरातील विविध भागात असलेल्या अस्वच्छतेमुळे आणि बदलत्या वातावरणामुळे या आजाराने हातपाय पसरल्याचे बोलले जात आहे. डोळ्यांचा आजार हा संसर्गजन्य असल्यामुळे आरोग्य विभागापुढेही आव्हान उभे ठाकले आहे. डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, चिपड येणे, डोळ्यांना खाज सुटणे, सकाळी उठल्यावर डोळे उघडता न येणे, पाणण्यांवर सूज येणे, अंधूक दिसणे आदी विविध प्रकारची लक्षणे डोळ्यांचा आजार झालेल्या रुग्णांत दिसून येतात. ‘अ‍ॅडिनोव्हायरस’ हे विषाणू अस्वच्छतेमुळे वाढल्याने हा आजार पसरत आहे. खोकला आणि स्पर्श अशा विविध कारणांनी हा आजार पसरत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.डोळ्यांतील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो. त्याला ‘कॉन्जुक्टिव्ह’ म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग होऊ डोळे चोळावेसे वाटतात. त्यालाच ‘डोळे आले’ असे म्हणतात. मागील आठवडाभरापासून शहरात या आजाराने थैमान घातल्याने खासगी आणि शासकीय रुग्णांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी होत आहे.डोळे आल्यास काळ्या चष्म्याचा उपयोग करावा, दिवसातून किमान चार-पाचवेळा स्वच्छ पाण्याचे डोळे धुवावे, डोळ्यात ड्रॉप्स, मलम (आॅइनमेंट) वापरताना हात स्वच्छ धुवावे. डोळ्यांकरिता वापरलेले रूमाल गरम पाण्यात स्वच्छ धुवावे त्याचप्रमाणे डोळे आलेल्या व्यक्तीचे कुठलेही साहित्य वापरू नये.गर्दीच्या ठिकाणी डोळे आलेल्या व्यक्तीने जाऊ नये. रुग्णाने डोळे पूर्ण बरे होईस्तोवर कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर टाळावा, जीवनसत्त्वयुक्त आहार घ्यावा, औषधोपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.पावसाळ्यापासून आतापावेतो दररोज चार-पाच रुग्ण उपचाराकरिता येत आहेत. या आजाराचा बुब्बुळावर पर्यायाने दृष्टीवरदेखील परिणाम होताना दिसून येत आहे. डोळ्यांचा आजार संसर्गजन्य असून संपर्कातून याचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होतो. कुटुंबात एखाद्याला याची लागण झाल्यास इतरांनी त्याचे साहित्य वापवरणे टाळावे. दिवसातून तीन-चारवेळा डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे.वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.डॉ. प्रदीप सुने, नेत्रतज्ज्ञ, वर्धा

टॅग्स :Healthआरोग्यeye care tipsडोळ्यांची काळजी